सख्या ...
हे असं अवखळपण , चंचलपण .. कधी पानं , फुलं , तारे , कधी स्वप्नं वेचताना , हसून बघत होतास .. उतरणीवर कधी घसरले , तेव्हांही , गालात हसून , बोट दिलेस धरायला .. दुस्तर वाटेवर कधी कचरले तर , डोळ्यांनी धीर दिलास .. पाठीवर हात ठेवून , झुंजायला बळ दिलेस .. हात सुटले हातातून , पण साथ नाही सरली , तू आहेसच खास , मागेपुढे , आसपास .. दिसला नाहीस कधी , पण जाणवतो तुझा वास .. आता जीर्ण झालीय श्वासांची माळ , जेव्हां ओघळेल तेव्हां , असशील ना आसपास ... ?