प्रेम ..

रुमी म्हणतो ,
प्रत्येक धर्मात प्रेम आहे ,
पण प्रेमाला मात्र धर्म नाही ..
अरे , प्रेमालाही धर्म आहे ..
ज्याला तो कळला ,
तो झऱ्या सारखा वाहत गेला ,
किनाऱ्यावर प्रेम उधळीत ...
त्यालाही भेटली प्रेमाची सरिता ..
प्रेमाचा धर्म पाळता पाळता ,
दोघे विलीन झाले परस्परांत ,
प्रेमाच्या विशाल सागरात..
आपलेच प्रतिबिंब पाहत ,
नभाच्या आरशात ..
तुझ्यात , माझ्यात ..
त्याच्यात , तिच्यात ....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २