उपनिषद चिंतन : - १
ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत ।
तेन त्यक्तेन भुँजीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम ॥१॥
अन्वयार्थ : -
जगत्यां - अखिल ब्रह्मांडात
यत्किंच - जे काहीही
जगत - जड, चेतनरूप जग आहे ते
इदं सर्वं - ते सर्व
ईशावास्यम - ईश्वराने व्याप्त आहे (म्हणून )
तेन - ह्या ईश्वराचे (स्मरण करीत )
त्यक्तेन भुँजीथा: - त्यागपूर्वक भोगा
मा गृध: - त्यांत आसक्त होऊ नका (कारण )
धनं कस्य स्वित् - कोणाचे आहे ?
- अर्थातच कोणाचेच नाही ..म्हणून कोणाच्याही धनाबद्दल आसक्ती ठेवू नका ..
Comments