उपनिषद चिंतन : - ६
आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचारप्रवाहाला
उपनिषद उत्तर देते, मीही ईश्वर व सृष्टीही ईश्वर ..
हा मंत्र असे सांगतो की , हे जगत ईश्वराचे आवास
स्थान आहे ..यत्किंच जगत्यां जगत । ..जगत म्हणजे काय ? ..तर , गच्छति इति जगत । ..जे
परिवर्तनीय असते ते जगत ..कोण बदलते ? ..तर
जीव व जड पदार्थ बदलतात .. जड पदार्थाच्या
मूळ स्वरूपात विकार होतो .. तर ज्ञानाच्या कमी-
अधिक प्रमाणाने जीव बदलतो ..ह्या दोन्ही विकारी गोष्टी जगत या शब्दात अभिप्रेत आहेत ..
या सृष्टीत जे जे विकारी आहे , ते ते भगवंताचे
आवास स्थान आहे ..म्हणजे जड व जीवा बरोबरच सृष्टीत ईश्वर राहतो .हे सारे विश्व चैतन्याने
भरलेले आहे ..
आता वैज्ञानिकही याच निष्कर्षाला येऊन
पोचले आहेत ..त्यांच्या मते जगात सारे चैतन्यच
(spirit)आहे ..अणुअणूत चैतन्य भरले आहे ..
काही गोष्टीतील चैतन्य वेगळेही करता येते .जशी
energy ..शंकराचार्यही हेच सांगतात ..वासुदेवं
जगत सर्वं । ..जग वासुदेवस्वरूप आहे ..सृष्टी ही
ईश्वरस्वरूप आहे ..म्हणूनच सृष्टी उपभोग्य नसून
वंदनीय आहे ..सृष्टीशीही तीन प्रकारे संबंध असू
शकतो ..भोग संबंध, भाव संबंध व भक्ती संबंध ..
Comments