उपनिषद चिंतन : - १०
हीच गोष्ट कामनांचीही ..काम , क्रोध हे ही
असायला पाहिजेत ..कामनेमुळेच तर जीवन पुढे
सरकते ..व्यतीत होते ..काम , क्रोध , मत्सर हे
असायलाच पाहिजेत ..कामना ही जीवनातील
एक अलौकिक गोष्ट आहे ..पण तिचेही उदात्ती- करण झाले पाहिजे ..कामना प्रथम भोगकार्या साठी , नंतर परकार्यासाठी आणि शेवटी प्रभू -
कार्यासाठी असायला पाहिजे ..
क्रोध ही असायला हवा ..सुरुवातीला स्वार्था
साठी क्रोध , नंतर असत् कार्या विषयी क्रोध आणि
शेवटी इंद्रियांविषयी क्रोध निर्माण व्हावा .. ही
आध्यात्मिक गोष्ट झाली ..यानंतर प्रभूवर क्रोध
यावा ..संत भगवंताशी झगडतात ..ते चित्ताची
एकाग्रता करता करता प्रगती करतात .. त्यांना
पूर्णतेचा अनुभव येईपर्यंत त्यांचे भगवंताशी गोड
भांडण चाललेले असते ..त्यांचा प्रभू वरचा क्रोध
मधुर असतो ..चित्त एकाग्र झाले नाही तर त्यांना
राग येतो ..असा क्रोध असला पाहिजे..तो काही
इतका वाईट नाही .. तो क्षुद्र स्वार्थासाठी असेल तर वाईट म्हणतात ..या क्रोधाचेही विभूती करण
करायला हवे ..उच्च स्थितीला पोचलेल्या लोकांना
काम , क्रोध ,मोह हे ईश्वरी प्रसाद वाटतात ..
आपल्या आजूबाजूला दिसणारा हिरवागार
निसर्ग असतो त्याचा मला मोह वाटतो , कारण
त्याच्या पाठीमागे मला ईश्वराचा हात दिसतो ..
असा व्यवहारही करायचा आणि परमार्थ ही
भोगायचा ..प्रभू कार्याचा मोह धरायचा ..
आपल्या ठिकाणी मद , उन्मत्तपणा असतो ..
मी प्रभूचा आहे याची मला मिजास वाटते ..
सत्ता , पैसा यांचा मद नको , कारण त्यामुळे
दुसऱ्या चे नुकसान होते ..पण भक्तीच्या मदाने
कुणाचेही नुकसान होत नाही ..
ही जडसृष्टी व जीवसृष्टी हे सर्व ईशावास्यम
आहे .. इतर गोष्टी कदाचित पटतील , पण विकार व विषयही ईशावास्यम , ही गोष्ट मात्र लवकर पटत नाही ....
Comments