उपनिषद चिंतन : - ७

       या  भोगसंबंध आणि  भाव संबंधांचे पूज्य  दादांनी फारच सुंदर स्पष्टीकरण केले आहे ... एखाद्या मोगऱ्याच्या झाडावर सुंदर  फुले  फुलली
असावीत ..त्यांच्या  केवळ  किमतीचा विचार हा
भोग संबंध झाला ; पण त्या सुगंधी फुलांच्या  सुवासाने  अतीव आनंद होणे हा त्या झाडाशी असलेला भाव संबंध झाला .. याच्याही पुढची  पायरी म्हणजे , त्या सुंदर , सुवासिक  फुलांच्या
निर्मिती मागचा भगवंताचा हात आठवणे हा त्या
झाडाशी व भगवंताशी असलेला भक्तीसंबंध होय .
          वृक्ष आणि वानर यांची भारतात भगवान म्हणून पूजा होते ..मात्र पाश्चात्य लोक  याबद्दल
आपला उपहास करतात ,कारण ते लोक याच्या
मुळाशी असलेला श्रद्धा भाव लक्षात घेत नाहीत.. आपण वड-पिंपळाच्या झाडांना नमस्कार करतो..
याच्या मागे आपला विशिष्ट दृष्टिकोण  आहे .. आपण जगाचे दोन भाग पाडले  आहेत ..एक
जडसृष्टी आणि दुसरी जीवसृष्टी .. जगत या शब्दात जड व जीव या दोहोंचा समावेश होतो ..
जड पदार्थ व जीव दोन्ही ईश्वरमय आहेत ..याच
साठी सर्व  जीवनच ईश्वरमय आहे , अशी  दृष्टी
यायला  पाहिजे ..
        

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २