उपनिषद चिंतन : - ९

      शब्द , स्पर्श , रूप , गंध इ  साऱ्या  विषयांतून
आपल्याला सृष्टी जाणण्याची   उत्सुकता असते ..
आपल्याला आपले नाव ऐकण्याची आवड असते.
आपल्या स्त्रीचे , मुलांचे शब्द  ऐकण्याची इच्छा
असते ..या  भावनेला उच्च स्तरावर न्या .. तिचे
विभूतीकरण  करा ..मला शब्द ऐकायचा आहे ,
पण कुणाचा ?  गुरूचा  , संतांचा , भगवंताचा ..
त्यांच्या शब्दांत शक्ती , प्रेरणा आहे ..
       असेच स्पर्शाचेही उदात्तीकरण व्हायला हवे ..
सदोदित  केवळ पत्नीस्पर्शाची अपेक्षा ठेवू नका .
भावस्पर्शात फार मोठी शक्ती आहे ..गुरुस्पर्श व  भावस्पर्श यात फार मोठी शक्ती आहे ..त्यांची
अपेक्षा ठेवा .. मृत्युशय्येवर पडलेल्या व्यक्तीलाही स्पर्शाची अपेक्षा असते .. स्पर्श दोन प्रकारचा
असतो ..विकारजन्य व भावजन्य .. विकारजन्य
स्पर्शाचे उदात्तीकरण करुन त्याचे रूपांतर भाव जन्य स्पर्शात व्हायला पाहिजे ..शब्द व  स्पर्श हे
भगवंताने निर्माण केलेले असल्यामुळे त्यांना वाईट
म्हणणे म्हणजे  भगवंतालाच नांवे ठेवण्या सारखे
आहे ..अशा व्यक्तीचा जीवन -विकास कसा बरे  होणार ? ..
       आपल्याला रूप पाहण्याचीही इच्छा होते ..
आपण  कसेही असलो तरी आरशात पाहून प्रसन्न
होतो ..आपल्याला हसरा चेहरा आवडतो .कुणाचा
रडवा चेहरा सहन होत नाही ..केवळ तो  पाहणे न
आवडण्यापेक्षा , तो तसा रडवा असू  नये ,  असेच
वाटले पाहिजे ..कुणीच दु:खी असू  नये ही भावना
असावी ..त्या चेहऱ्यावरचे दु:ख नाहीसे करता आले पाहिजे ..रूप हे भोगासाठी आहे ही कल्पना
खोटी ..रूपाचेही उदात्तीकरण व्हायला पाहिजे ..
शरीर सौंदर्याकडून निसर्ग सौंदर्याकडे जा ..प्रभूचे
रूप बघण्याची इच्छा  होईल ..
      याचप्रमाणे रस .. भोगरसापेक्षा भक्तिरस, आत्मरस या क्रमाने उदात्तीकरण व्हायला हवे ..
      नंतर गंध ..क्षुद्र गंधाचा मोह ठेवू नका ..तर
सात्विक गंधाची इच्छा ठेवणे हे त्याचे उदात्तीकरण
आहे ..जीवनाला संतांचा , प्रभूंचा सुगंध यावा ..
      विषय  व विकार राहणारच ..आपण त्यांचे
उदात्तीकरण करीत राहिले पाहिजे .. म्हणजे तेच
भगवद्रूप वाटतील ..ही भक्तीची परिसीमा आहे ..

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २