Posts

Showing posts from June, 2018

उपनिषद चिंतन : - ९

      शब्द , स्पर्श , रूप , गंध इ  साऱ्या  विषयांतून आपल्याला सृष्टी जाणण्याची   उत्सुकता असते .. आपल्याला आपले नाव ऐकण्याची आवड असते. आपल्या स्त्रीचे , मुलांचे शब्द  ऐकण्याची इच्छा असते ..या  भावनेला उच्च स्तरावर न्या .. तिचे विभूतीकरण  करा ..मला शब्द ऐकायचा आहे , पण कुणाचा ?  गुरूचा  , संतांचा , भगवंताचा .. त्यांच्या शब्दांत शक्ती , प्रेरणा आहे ..        असेच स्पर्शाचेही उदात्तीकरण व्हायला हवे .. सदोदित  केवळ पत्नीस्पर्शाची अपेक्षा ठेवू नका . भावस्पर्शात फार मोठी शक्ती आहे ..गुरुस्पर्श व  भावस्पर्श यात फार मोठी शक्ती आहे ..त्यांची अपेक्षा ठेवा .. मृत्युशय्येवर पडलेल्या व्यक्तीलाही स्पर्शाची अपेक्षा असते .. स्पर्श दोन प्रकारचा असतो ..विकारजन्य व भावजन्य .. विकारजन्य स्पर्शाचे उदात्तीकरण करुन त्याचे रूपांतर भाव जन्य स्पर्शात व्हायला पाहिजे ..शब्द व  स्पर्श हे भगवंताने निर्माण केलेले असल्यामुळे त्यांना वाईट म्हणणे म्हणजे  भगवंतालाच नांवे ठेवण्या सारखे आहे ..अशा व्यक्तीचा जीवन -विकास कसा बरे  होणार ? ..        आपल्याला रूप पाहण्याचीही इच्छा होते .. आपण  कसेही असलो तरी आ

उपनिषद चिंतन : - ८

         सर्व विश्व ईश्वरमय आहे हे ज्ञान आहे , पण अनुभव नसल्याने आपल्याला विषय व विकार हे भयंकर वाटतात .. या विषयांना व विकाराना ही ईशावास्यम माना असे प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य फक्त वेदांमध्येच आहे ..गीता सांगते : - धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ ॥  गीतेने  यात कामाचा स्वीकार केला आहे , त्याला विभूती मानण्यास सांगितले  आहे ..कारण , हे  विषय व विकारही भगवंतानेच निर्माण केले आहेत..त्याने ते  निर्माण करुन जीवाला कृतार्थ बनविले आहे .. भगवंतापासून वेगळे झाल्यावर ते चैतन्य कोठल्या आधारावर जगणार?त्याचे जीवन कसे चालणार? यासाठी भगवंताने ही खेळणी दिली आहेत ..          विषय आणि विकार यांचा तिरस्कार करुन ते  जाणार नाहीत ..त्यांना भगवंताने निर्माण केले आहे , म्हणून ते सुंदर आहेत ..त्यांचीही आपणास गरज आहे ..नको  म्हणून ते जाणार नाहीत.. ते  विषय आहेत हे समजूनच त्यांचे सेवन करायला पाहिजे ..       हे जगत कोणाचे ? भगवंताचे ..मी कोणाचा ? भगवंताचा .. तसेच हे विषय व विकार भगवंताने निर्माण केलेले असल्यामुळे , त्यांची निर्भत्सना करुन चालणार नाही .. जे ती करतात त्यांना या जगाचे रह

उपनिषद चिंतन : - ७

       या  भोगसंबंध आणि  भाव संबंधांचे पूज्य  दादांनी फारच सुंदर स्पष्टीकरण केले आहे ... एखाद्या मोगऱ्याच्या झाडावर सुंदर  फुले  फुलली असावीत ..त्यांच्या  केवळ  किमतीचा विचार हा भोग संबंध झाला ; पण त्या सुगंधी फुलांच्या  सुवासाने  अतीव आनंद होणे हा त्या झाडाशी असलेला भाव संबंध झाला .. याच्याही पुढची  पायरी म्हणजे , त्या सुंदर , सुवासिक  फुलांच्या निर्मिती मागचा भगवंताचा हात आठवणे हा त्या झाडाशी व भगवंताशी असलेला भक्तीसंबंध होय .           वृक्ष आणि वानर यांची भारतात भगवान म्हणून पूजा होते ..मात्र पाश्चात्य लोक  याबद्दल आपला उपहास करतात ,कारण ते लोक याच्या मुळाशी असलेला श्रद्धा भाव लक्षात घेत नाहीत.. आपण वड-पिंपळाच्या झाडांना नमस्कार करतो.. याच्या मागे आपला विशिष्ट दृष्टिकोण  आहे .. आपण जगाचे दोन भाग पाडले  आहेत ..एक जडसृष्टी आणि दुसरी जीवसृष्टी .. जगत या शब्दात जड व जीव या दोहोंचा समावेश होतो .. जड पदार्थ व जीव दोन्ही ईश्वरमय आहेत ..याच साठी सर्व  जीवनच ईश्वरमय आहे , अशी  दृष्टी यायला  पाहिजे ..         

उपनिषद चिंतन : - ६

         आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचारप्रवाहाला उपनिषद  उत्तर  देते, मीही ईश्वर व सृष्टीही ईश्वर .. हा मंत्र असे सांगतो की , हे जगत ईश्वराचे आवास स्थान आहे ..यत्किंच जगत्यां जगत । ..जगत म्हणजे काय ? ..तर , गच्छति इति जगत । ..जे परिवर्तनीय असते ते जगत ..कोण बदलते ? ..तर जीव व जड पदार्थ बदलतात .. जड पदार्थाच्या मूळ स्वरूपात विकार होतो .. तर ज्ञानाच्या कमी- अधिक प्रमाणाने जीव  बदलतो ..ह्या  दोन्ही  विकारी गोष्टी जगत या शब्दात अभिप्रेत आहेत .. या सृष्टीत जे जे विकारी आहे , ते ते भगवंताचे आवास स्थान आहे ..म्हणजे  जड  व जीवा बरोबरच सृष्टीत ईश्वर राहतो .हे सारे विश्व चैतन्याने भरलेले आहे ..         आता  वैज्ञानिकही याच निष्कर्षाला येऊन पोचले  आहेत ..त्यांच्या मते जगात सारे चैतन्यच (spirit)आहे ..अणुअणूत चैतन्य भरले  आहे .. काही गोष्टीतील चैतन्य वेगळेही करता  येते .जशी energy ..शंकराचार्यही हेच  सांगतात ..वासुदेवं जगत सर्वं । ..जग वासुदेवस्वरूप आहे ..सृष्टी ही ईश्वरस्वरूप आहे ..म्हणूनच सृष्टी  उपभोग्य नसून वंदनीय आहे ..सृष्टीशीही तीन प्रकारे संबंध असू शकतो ..भोग संबंध, भाव संब

उपनिषद चिंतन : - १

ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत । तेन त्यक्तेन भुँजीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम ॥१॥ अन्वयार्थ : -  जगत्यां  - अखिल ब्रह्मांडात यत्किंच  - जे काहीही जगत  - जड, चेतनरूप जग  आहे  ते इदं सर्वं  - ते  सर्व ईशावास्यम - ईश्वराने व्याप्त आहे (म्हणून ) तेन - ह्या ईश्वराचे (स्मरण करीत ) त्यक्तेन भुँजीथा: - त्यागपूर्वक भोगा मा गृध: - त्यांत  आसक्त होऊ  नका (कारण ) धनं कस्य स्वित् - कोणाचे  आहे ? - अर्थातच कोणाचेच  नाही ..म्हणून कोणाच्याही धनाबद्दल आसक्ती ठेवू  नका ..

उपनिषद चिंतन : - ५

       मात्र उपनिषदांत मांडलेली विचारधारा पूर्ण आहे ..उपनिषद सांगते , ' पूर्णमद: पूर्णमिदम।'   मी आणि जगत या दोघांचाही एकदम विचार करायला हवा ..कारण , मी पण श्रेष्ठ व ही सृष्टीही  श्रेष्ठ ..मी व सृष्टी यांच्यातील संघर्षच शास्त्रकारांनी नाहीसा केला आहे ..मी ईश्वर आहे , पण वस्तूला तुच्छ म्हणण्याचा मला अधिकार नाही , कारण ही सृष्टीही ईश्वर आहे ..म्हणून कोणीही हीन वा हलके नाही ..         आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ या दोन्ही विचारधारा अपूर्ण व अर्धसत्य आहेत ..आत्मनिष्ठ हे भक्त खरे पण अर्धभक्त आहेत ..ज्यांनी ईशावास्यम विचार स्वीकारला ते पूर्णभक्त होत ..मी पूर्ण व सृष्टीही  पूर्ण हे ईशावास्याचे रहस्य आहे ..आपल्या वैदिक  संस्कारातही हाच विचार आढळतो ..       सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समाचरेत ।      वस्तूला प्रभुरूप माना , निदान वस्तू ही प्रभूची माना .ही सृष्टी  ईश्वराने का निर्माण केली तर , ' लोकवत्तु लीला कैवल्यम । ' लीलेचा हेतू आहे .. क्षुद्र , अपवित्र किंवा स्वार्थी हेतू नाही ....

उपनिषद चिंतन : - ४

         आजकाल  तर आपण माणसेही आपल्यात नीटपणे बोलत नाही ....तसे खूप बोलतो , पण अंतःकरणापासून बोलत नाही ..हृदयाने कोणाशी तरी बोलणे ही वेगळीच गोष्ट आहे ...भाव जीवन जगणाऱ्याशी  संपूर्ण सृष्टी बोलते ..          आत्मनिष्ठ जीवन  जगणाऱ्या लोकांना हे उपनिषद मार्गदर्शक आहे .. ..ते सांगते , ' मीही ईश्वर आणि सृष्टीही  ईश्वर .. ..आज जगात  दोन प्रकारचे विचार -प्रवाह आहेत ..आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ ..subjective आणि objective .. आत्मनिष्ठ विचार स्वतःला प्राधान्य देतो ...मी आणि सृष्टीत मी मोठा ..सृष्टी  आणि  संस्कृती माझ्यासाठी  आहे ..तिला मारूनही मी जगेन .. तसेच समाज व देशही माझ्यासाठी आहे .त्यांच्या साठी मी मरायला  तयार नाही ..        दुसरा वस्तुनिष्ठ  विचार हा लेनिन सारख्या महान लोकांचा आहे ..तो म्हणतो , ' समाजातून व्यक्ती निर्माण झाली आहे ..म्हणून समाज , देश , राष्ट्र यांच्यासाठी  बलिदान केले  पाहिजे..' पृथ्वी साठी आत्म्याचा , स्वतःचा त्याग करावा असे ही विचारधारा सांगते , तर आत्मनिष्ठ विचारधारा म्हणते  - आत्मार्थे पृथिवी त्यजेत ।        आत्मनिष्ठ विचार स्वतःला प्राध

उपनिषद चिंतन : - ३

          भोगवादी जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या मस्तकात भोग भरलेला असतो ..त्याला सृष्टीत  भोगाशिवाय काहीच दिसत नाही ..राक्षस असतो आपल्यापैकीच , फक्त त्याचा दृष्टिकोण भोगवादी असतो ....अशा वृत्तीचे लोक वेदांचा अभ्यास करतात , पण तो भोगासाठी ,भागवत सप्ताह करतात , तो पैशासाठी ..अशा व्यक्तींना ही सारी सृष्टी आपल्याच भोगासाठी आहे , असे वाटते ..हे लोक या उपनिषदाचे वाचन करतील , तर नैतिक बनतील ..           जे लोक भावप्रधान आहेत , त्यांच्याशी ही सृष्टी बोलेल ..आपल्या प्राचीन मुनींना पर्वत पाहून स्थिरता मिळाली , पालवीकडे पाहून कोमलता मिळाली व सागराकडे पाहून गंभीरता मिळाली .. यासाठी कोणतीही शाळा नव्हती .. ही भावदृष्टी आहे .. सृष्टी  आपल्याला ज्ञान देते ..उपनिषदे सांगतात  की , सृष्टी  पाहून माणूस ज्ञानी होतो ...

उपनिषद चिंतन : - २

ईश +आवास्यम -ईशावास्यम अशी  या  शब्दाची  फोड  आहे ..एक  तर, ईश्वराने हे  जग आच्छादि त झाले  आहे , किंवा भक्तांनी ईश्वरी भावाने जग झाकले  आहे ..खरंच या सृष्टीत  भगवान  आहेत  का ? ..तर , होय ..भगवान सर्वव्यापी आहे ..हे जग त्यांनी  निर्माण केले  आहे ..आपल्या  प्रेमाने  हे जग झाकून टाकले आहे ..शिवाय त्यांनी या सृष्टीत प्रवेश केला आहे ..ह्यात भक्तांचे ईश्वर प्रेम दिसते ..म्हणजेच , ईशावास्यम मध्ये ईश्वराचे सृष्टी वरील व भक्तांचे ईश्वरा वरील प्रेम दिसते ..या जगातल्या  अणुरेणूत , अंतर्बाह्य भगवान आहेत.. या  उपनिषदाचा असा दृष्टिकोन आहे , की ह्या  जगात भगवान राहतो , तो  तटस्थही नाही आणि  वेगळाही नाही...        हे  उपनिषद वाचल्याने भोग-जीवन जगणा रा माणूस नैतिक होईल ,भाव -जीवन जगणाऱ्या  माणसाशी सृष्टी बोलेल व आध्यात्मिक जीवन  जगणाऱ्याला मार्गदर्शन मिळेल ...  

आभा ...

स्वतःबद्द्लचा अभिमान हे रागाचे कारण आहे .. मनात कधीही कसल्याही कारणाने राग ठेवू नये.. राग राग करून आपण स्वतःची मन:शान्ति बिघडवतो .. आपण आपला भलेपणा घालवतो .. मनाचा मोठेपणा नेहमी ठेवावा , अभिमान त्यागावा .. कोणालाही  प्रथम माफ़ करावे .. माफ केल्याने सर्व गुंता सुटतो नाहीतर सगळेच किचकट होवून जाते .. मनात सगळी जळमटे वाढतात , माफ़ केले तर सगळे मोकळे मोकळे होते .. मनाचे आभाळ निरभ्र होत ... स्वतः ला मन:शान्ति मिळते .. सुप्रभात ........आभा घोटणे

प्रेम ..

रुमी म्हणतो , प्रत्येक धर्मात प्रेम आहे , पण प्रेमाला मात्र धर्म नाही .. अरे , प्रेमालाही धर्म आहे .. ज्याला तो कळला , तो झऱ्या सारखा वाहत गेला , किनाऱ्यावर प्रेम उधळीत ... त्यालाही भेटली प्रेमाची सरिता .. प्रेमाचा धर्म पाळता पाळता , दोघे विलीन झाले परस्परांत , प्रेमाच्या विशाल सागरात.. आपलेच प्रतिबिंब पाहत , नभाच्या आरशात .. तुझ्यात , माझ्यात .. त्याच्यात , तिच्यात ....

विंदा ...

आषाढी एकादशी निमित्त खास- पंढरपूरच्या वेशी बाहेर एक आहे छोटी शाळा.. सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा... दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय ? न जाणो , असेल ' विठ्ठल '... --विंदा करंदीकर

नामदेव ...

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। माझियां सकलां हरिच्या दासा ।।१।। कल्पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संतमंडळी सुखी असो।।२।। अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या विष्णुदासा भाविकांसी।।३।। नामा म्हणे तयां असावे कल्याण। ज्या मुखी निधान पांडुरंग।।४ - संत नामदेव

आई ...

आई ती होती माझी, किती नर्म मृदुल हातांची, शोधेन कुठे मी तिजला, का भार  उरावर असला.... हा मातृवियोगही असला, देवांसही नाही चुकला, स्नेहाच्या बागेमधुनी, चाफा तो सुकुनी गेला....

अटलजींची कविता ..

अटलजीं की कविता .... ***************** आओ मन की गाँठें खोलें. यमुना तट, टीले रेतीले घास फूस का घर डंडे पर, गोबर से लीपे आँगन में, तुलसी का बिरवा, घंटी स्वर. माँ के मुँह से रामायण के दोहे चौपाई रस घोलें, आओ मन की गाँठें खोलें. बाबा की बैठक में बिछी चटाई बाहर रखे खड़ाऊँ, मिलने वालों के मन में असमंजस, जाऊं या ना जाऊं, माथे तिलक, आंख पर ऐनक, पोथी खुली स्वंय से बोलें,  आओ मन की गाँठें खोलें. सरस्वती की देख साधना, लक्ष्मी ने संबंध ना जोड़ा, मिट्टी ने माथे के चंदन बनने का संकल्प ना तोड़ा, नये वर्ष की अगवानी में, टुक रुक लें, कुछ ताजा हो लें, आओ मन की गाँठें खोलें...

मराठी अभिमानगीत...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामानात दंग ते मराठी आमुच्या रगरगात रंगते मराठी आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी आमुच्या नसानसात नाच ते मराठी आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रांगते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी आमुच्या कुला कुलात नांदते मराठी येथल्या फुलाफुलात हासते मराठी येथल्या दिशादिशात दाट ते मराठी येथल्या नगानगात गर्जते मराठी येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या तरुलतात साजते मराठी येथल्या कळीकळीत लाजते मराठी येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते मराठी *मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*

चांगभलं ...

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊचा “शिवबा” झाला… •ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून  कळली, तो मुक्ताईचा “द्यानदेव” झाला… •ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून  कळली, तो राधेचा “श्याम” झाला… •आणि  ज्याला स्त्री पत्नी  म्हणून  कळली, तो सीतेचा “राम” झाला… “प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि  यशात,  स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे” म्हणूनच असा  जाणता  पुरुष  भेटो,  हीच  एकमेव इच्छा ....

प्रार्थना ..

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

पृथ्वीचे प्रेमगीत ...

*मा.कुसुमाग्रजांची एक सुंदर कवीता* *पृथ्वीचे प्रेमगीत* युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करु प्रीतीची याचना नव्हाळीतले ना उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे विझोनी आता यौवनाच्या मशाली ऊरी राहीले काजळी कोपरे परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अन् जागती न जाणे न येणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकिती दिव्य उल्काफुले परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा मला वाटते विश्व अंधारले तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचूनिया दिव्य तेजःकण मला मोहवाया बघे हा सुधांशू तपाचार स्वीकारुनी दारुण निराशेत सन्यस्थ होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव पिसाटापरी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी आर्जव पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी प्रीतीची याचना लाजुनी लाल होऊनिया लाजरा मंगळ परी दिव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर शहारून येते कधी अंग तू

उठो द्रौपदी ...

*अटलबिहारी वाजपेयींनी* *लिहिलेली ही कविता....* _आजच्या परिस्थितीत ती समोर आली ...._ उठो द्रौपदी वस्त्र संम्भालो अब गोविन्द न आयेंगे। कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से। कैसी रक्षा मांग रही हो दु:शासन दरवारों से। स्वंय जो लज्जाहीन पड़े हैं वे क्या लाज बचायेंगे। उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोबिन्द न आयेंगे। कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है। होंठ सिल दिये हैं जनता के कानों पर पहरा भी है। तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारे किसको क्या समझायेंगे। उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोबिन्द न आयेंगे। छोड़ो मेंहदी भुजा संम्भालो खुद ही अपना चीर बचा लो। द्यूत बिठाये बैठे शकुनि मस्तक सब बिक जायेंगे। उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोविद न आयेंगे। 🙏🙏🙏

कळा ...

कालची कळी मिटलेली , नि आजची उमललेली.. मधे असतात का उमलण्याच्या कळा ? कुणी जाणून घेतल्या ?

आई ...

तुझी वाणी लाघवीशी । रुंजी घाले मनापाशी । तिला खोटं म्हणू कशी । तू आहेस खासच इथे ॥ पानं फुलं लता झाडे । प्रसन्नता चोहीकडे । भासे तुझेच रुपडे । तू  आहेस  नक्की इथे ॥ प्राजक्ताचा  सडा ।  घमघमतो केवडा । पडे सुगंधाचा वेढा ।  तू आहेस  नक्की  इथे ॥ फूल पाखरांचे गूज । चिमण्यांची कुजबूज । वेध लावी अलगूज । तू  आहेस  नक्की इथे ॥ ऋतु सरेल  उरेल । असशील नसशील । भास होतच राहील । तू आहेस  नक्की  इथे ॥ ......सुषमा करंदीकर......

तो, नि मी ...

तो गाडी हांकत बसतो , मी स्वच्छंदी  शेजारी .. डोंगर , शेते नि झाडी , मी भटक्या मधे उतारी ... तोंडामधी  पान भरोनी , तो गाणी ऐकत बसतो .. अन मधुनच माझ्यावरती , तो लक्ष  ठेवुनी असतो ... कामकरी वा शाळकरीं ना, उंचावुनी हात  मी  करते .. कधि रस्त्यातील  कुत्र्याला , करुनी नक्कल , चिडविते ... व्हॉटसप , फेसबुक वरती ,  फोटो  अपलोड मी  करते.. निघतो , निघाले सांगुनी ,  सगळ्यांचा निरोप  घेते ... तो मधुनच पाही सगळे , अन दटावतो मजलातें .. किती टुक टुक टुक करिशी ते , गे दुखतील  ना ती  बोटे ... मोबाइल वापरण्याची , मी  किती  बुराई करते .. माझ्याच वापरावरती, माझेच नियंत्रण  नसते .... 🙄🙂😫😊😬😀😄😅😉

खरे ? ..

माणसाला, त्याने दिलेल्या  उत्तरावरुन नव्हे , तर , त्याने विचारलेल्या प्रश्नावरुन ओळखावे ...