मैत्र ...
बंधनाच्या पलिकडे ,
एक नाते असावे ..
नात्याला शब्दांचे ,
बंधन नसावे ...
प्रेमळ भावनांचा ,
त्याला आधार असावा ..
दु:खाला तेथे
थारा नसावा ...
सुखाचा शिरवा ,
जिवाचा विसावा ..
असा गोडवा ,
आपल्या मैत्रीत असावा ...
मनातले न सांगता ,
तुझ्या पर्यंत पोचावे ,
न बोलताच तुझे शब्द ,
कानांवर यावे ...
ग्रीष्मात पाऊस पाडतील
असे ढग असावे ...
वाटेवर काटयांतूनही
गुलाब फुलावे ...
हात हाती नसले ,
तरी सन्निध असावे ..
डोळ्यांसमोर न संपणारे ,
एक स्वप्न असावे ...
कोणती दिशा , कुठली वाट,
गांव कोणतेही असावे ..
आयुष्याच्या सीमेपार ,
मैत्र जीवाचे असावे ....
Comments