इवलीशी चिमणुली ...

रोज सकाळी ,
प्रभातफेरीच्या वेळी ,
बघत असे  मी ती ,
इवलीशी चिमणुली ..
झुडपातल्या  घरट्यातून ,
डोकावून बघतेली ,
उडाया शिकवी तिला ,
साजुकशी माऊली ..
बघता  बघता , 
भरारी  घेतली ,
उडाया शिकली ,
इवलीशी चिमणुली ..
नाचाया शिकली ,
मुरकाया लागली ,
वयात  आली ,
इवलीशी  चिमणुली ..
गोंडसशा चिमण्याच्या ,
नजरेत भरली ,
गिरक्या  घेई  ,
तिच्याच भवताली ..
दुसरा एक हुंबाड ,
आला  तया वेळी ,
त्याच्याही मनामधी ,
भरली  चिमणुली ..
चल  ग  ए  मुली ,
धमकी  अशी  दिली ,
गोंडस  चिमण्याची ,
हकालपट्टी केली ..
नाजुकशी  चिमणुली ,
जरा नाही  भ्याली,
भिरभिरून चोच त्याची ,
बोचकारून काढली ..
इवल्याशा तळ्याच्या ,
काठावर आली ,
पंख , चोच पावले ,
साफसूफ केली ..
घाबरून तळी ,
जवळ  नाही केली ,
असं  कधी शिकतील,
माणसांच्या  मुली ? ?

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?