उपनिषद चिंतन : - ११
श्रीमत् शंकराचार्यांनी असा सिद्धांत मांडला
की हे जग असत् आहे ..World is unreal n
changing .. हा सिद्धांत अगदी खराच आहे ..हे
जग क्षणोक्षणी बदलते , तर त्याला खरे कसे बरे मानता येईल ? ..जळणारी ज्योती या क्षणी आहे
ती दुसऱ्या क्षणी नाही , हे बौद्धिक दृष्टीने पटणारे
आहे ..हेच त्यांनी भावनात्मक रीतीनेही सांगितले
आहे ..जसे , बालकाच्या हातात एखादे खेळणे आले , की ते त्यात एकाग्र होऊन जग विसरते , तसेच भगवत्स्वरूपात जीव एकाग्र होऊ लागला
की भक्त जग विसरतो ..त्या ठिकाणी विश्व खोटे
ठरते .समाधीच्या आनंदात रमून जाते ..म्हणूनच
जगत् असत् आहे , हे आचार्यांचे विधान असत्य
नाही ...
विकार वाईट नाहीतच .. उलट ते जवळ
असायला हवेत ..विषयांचे व विकारांचे आपण
इतके उदात्तीकरण करावे , की ते करता करता
आपण सुंदर होत जावे ..आपण इतके सुंदर व्हावे , की भगवंताना आपलेसे व्हावे .. त्यांनी
आपल्यासाठी विकारी व्हावे ..त्यांना कधी एकदा
भक्ताला भेटू , असे व्हावे ..पुंडलिकाची गोष्ट
आठवते ना ? .. त्याला भेटण्यासाठी भगवंत आले , तर मला वेळ नाही असे सांगत , त्याने
भगवंतांना विटेवर तिष्ठत उभे ठेवले ..
भक्तीशास्त्रातील ही एक विलक्षण अवस्था
आहे .. जेव्हां जीवाला भगवंताला भेटण्याची
आतुरता असते , त्यावेळी भगवंत निर्विकार असतात ..साधनेने जीव हळूहळू निर्विकारी होतो .
आणि मग त्याला भेटण्यासाठी भगवान अधीर
होतो ..मात्र जीव तितकाच शांत असतो ..त्याला
भगवंताला भेटायला वेळ नसतो ..देव नि भक्त
यांच्यातील ही एक क्रीडा आहे ..
Comments