उपनिषद चिंतन : - ३
भोगवादी जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या
मस्तकात भोग भरलेला असतो ..त्याला सृष्टीत
भोगाशिवाय काहीच दिसत नाही ..राक्षस असतो
आपल्यापैकीच , फक्त त्याचा दृष्टिकोण भोगवादी
असतो ....अशा वृत्तीचे लोक वेदांचा अभ्यास करतात , पण तो भोगासाठी ,भागवत सप्ताह
करतात , तो पैशासाठी ..अशा व्यक्तींना ही सारी
सृष्टी आपल्याच भोगासाठी आहे , असे वाटते ..हे
लोक या उपनिषदाचे वाचन करतील , तर नैतिक
बनतील ..
जे लोक भावप्रधान आहेत , त्यांच्याशी ही
सृष्टी बोलेल ..आपल्या प्राचीन मुनींना पर्वत पाहून स्थिरता मिळाली , पालवीकडे पाहून कोमलता
मिळाली व सागराकडे पाहून गंभीरता मिळाली ..
यासाठी कोणतीही शाळा नव्हती .. ही भावदृष्टी
आहे .. सृष्टी आपल्याला ज्ञान देते ..उपनिषदे
सांगतात की , सृष्टी पाहून माणूस ज्ञानी होतो ...
Comments