उपनिषद चिंतन : - ८
सर्व विश्व ईश्वरमय आहे हे ज्ञान आहे , पण
अनुभव नसल्याने आपल्याला विषय व विकार हे
भयंकर वाटतात .. या विषयांना व विकाराना ही
ईशावास्यम माना असे प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य फक्त वेदांमध्येच आहे ..गीता सांगते : -
धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ ॥ गीतेने यात कामाचा स्वीकार केला आहे , त्याला विभूती
मानण्यास सांगितले आहे ..कारण , हे विषय व
विकारही भगवंतानेच निर्माण केले आहेत..त्याने
ते निर्माण करुन जीवाला कृतार्थ बनविले आहे ..
भगवंतापासून वेगळे झाल्यावर ते चैतन्य कोठल्या
आधारावर जगणार?त्याचे जीवन कसे चालणार?
यासाठी भगवंताने ही खेळणी दिली आहेत ..
विषय आणि विकार यांचा तिरस्कार करुन
ते जाणार नाहीत ..त्यांना भगवंताने निर्माण केले
आहे , म्हणून ते सुंदर आहेत ..त्यांचीही आपणास
गरज आहे ..नको म्हणून ते जाणार नाहीत.. ते
विषय आहेत हे समजूनच त्यांचे सेवन करायला पाहिजे ..
हे जगत कोणाचे ? भगवंताचे ..मी कोणाचा ?
भगवंताचा .. तसेच हे विषय व विकार भगवंताने
निर्माण केलेले असल्यामुळे , त्यांची निर्भत्सना
करुन चालणार नाही .. जे ती करतात त्यांना या
जगाचे रहस्यच समजले नाही , असे नाइलाजाने म्हणावे लागेल .. सृष्टी सुंदरच आहे , तिचा तिरस्कार होईलच कसा ? फक्त या विषयांचे
उदात्तीकरण व्हायला हवे ...
Comments