तो, नि मी ...

तो गाडी हांकत बसतो ,
मी स्वच्छंदी  शेजारी ..
डोंगर , शेते नि झाडी ,
मी भटक्या मधे उतारी ...

तोंडामधी  पान भरोनी ,
तो गाणी ऐकत बसतो ..
अन मधुनच माझ्यावरती ,
तो लक्ष  ठेवुनी असतो ...

कामकरी वा शाळकरीं ना,
उंचावुनी हात  मी  करते ..
कधि रस्त्यातील  कुत्र्याला ,
करुनी नक्कल , चिडविते ...

व्हॉटसप , फेसबुक वरती , 
फोटो  अपलोड मी  करते..
निघतो , निघाले सांगुनी , 
सगळ्यांचा निरोप  घेते ...

तो मधुनच पाही सगळे ,
अन दटावतो मजलातें ..
किती टुक टुक टुक करिशी ते ,
गे दुखतील  ना ती  बोटे ...

मोबाइल वापरण्याची ,
मी  किती  बुराई करते ..
माझ्याच वापरावरती,
माझेच नियंत्रण  नसते ....
🙄🙂😫😊😬😀😄😅😉

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २