सर्व विश्व ईश्वरमय आहे हे ज्ञान आहे , पण अनुभव नसल्याने आपल्याला विषय व विकार हे भयंकर वाटतात .. या विषयांना व विकाराना ही ईशावास्यम माना असे प्रतिपादन करण्याचे सा...
Monday, September 24, 2007 प्राण्यांवरचे प्रेम?.. नेहमीप्रमाणे walk साठी दोघे बाहेर पडलो.वळणाशीच आम्हांला बंटीने गाठले.मोठ्या खुशीने अंगावर उड्या-बिड्या मारुन त्याने आपला आनंद व्यक्त केला,नि आमच्याबरोबर walk ला येण्याचे जाहीर केले; नव्हे, आमच्यापुढे चालूही लागला.बंटी, शेजारच्या पाठककाकांचा कुत्रा. आता त्याने पाठककाकांना की काकांनी बंटीला disown केले,माहीत नाही, पण आता तो सगळ्या गल्लीचा कुत्रा आहे. वृत्तीने अतिशय प्रेमळ आहे, पण आल्या-गेल्यांवर चागलाच लक्ष ठेवून असतो.गल्लीत कोणी आलेले खपत नाही त्याला मुळीच! आमच्याबरोबर चालताना,मस्त शानमध्ये चालतो.वाटेत येणार्या लहानमोठ्या कुत्र्यांकडे अजिबात लक्ष देत नाही.कुणाच्या अध्यात-मध्यात नसतो.कुरापतीही काढत नाही. तर, असे आम्ही पाथर्डी फाट्याच्या दिशेने निघालो. साईबाबा मंदिराच्या अलिकडे, पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले एक साठीचे गृहस्थ समोरून येताना दिसले. उंचे-पुरे,एकदम आडमाप. हातात साखळीने बांधलेला, लुकडासा, बिनशेपटीचा डोबरमन;दुसर्या हातात एक दणकट दांडू.. छडी नव्हे बरं.. दांडू! पूर्वी मी पाहिलं होतं, कुत्रे फिरवण...
ईश +आवास्यम -ईशावास्यम अशी या शब्दाची फोड आहे ..एक तर, ईश्वराने हे जग आच्छादि त झाले आहे , किंवा भक्तांनी ईश्वरी भावाने जग झाकले आहे ..खरंच या सृष्टीत भगवान आहेत का ? ..त...
Comments