सत्य ...

सत्य  म्हणजे काय असतं ,
काय  असतं  सत्य ..
असतं  तरी  का  सत्य ,
सत्य  कां  असतं ...
जेवढं दिसतं डोळ्यांना ,
तेवढंच  सत्य  नसतं ..
दृश्याच्या ही पलिकडे ,
सत्य  व्यापून  असतं ...
नसतं सांगोवांगी..
वा नसतं कर्णोकर्णी..
श्रुतींच्या पल्याड  जातं ,
कवाडे  भेदुनी ...
विश्वाचा गाभारा ,
आत परमात्मा धनी ..
सत्य हुंकार  तयाचा ,
गूढ प्रणवाचा ध्वनी ....

Comments

Popular posts from this blog

सख्या...

सख्या ...

चिटुकली?....