Posts

Showing posts from 2008

मीच वेडा...

'अरे खुशमन,जरा बाजुच्‍या गल्‍लीत जाऊन xerox करून आण बरं..'शेटजींची हाक ऐकू आली,नि मी भानावर आलो. पटकन्‌ कागद घेऊन,मी copy काढायला गेलो.पायर्‍या चढतानाच समोर मोरपिशी पदर सळसळला.निळ्‍याशार बांगड्‍यांनी भरलेल्‍या गोंडस हाताने,काचेचं दार ओढून घेत एक स्‍त्री अवखळपणे पायर्‍या उतरून गेली,नि खाली उभ्‍या असलेल्‍या silver honda city मध्‍ये बसून,सर्रकन्‌ निघून गेली..गाडी स्‍वत: चालवत !! मी चकित होऊन बघतच राहिलो. डौलात निघताना,तिने किंचित तिरप्‍या नजरेने माझ्‍याकडे पाहिले का? खोडकर हसू ओठांवर येऊन, तिने ते दडवले का? की, मला भास झाला? नाही..भास कसा असेल? हो.. हसलीच ती ! ती, तीच होती !! हां..,त्‍याचे असे झाले..मी जिथे watchman ची नोकरी करतो,ते काबरा emporium आणि axis bank शेजारी शेजारी आहेत.चौक ओलांडताच, डाव्‍या हाताला या दोन्‍ही इमारती आहेत, त्‍यामुळे हिरवा सिग्‍नल मिळालेली वाहने या रस्‍त्‍या वरून वेगाने पुढे जातात. आमच्‍या इमारती समोर जरा मोकळी जागा असल्‍याने, तिथे गाडी ठेवायचा मोह प्रत्‍येकालाच होतो. खरं तर ही जागा आमच्‍या ग्राहकांसाठी आहे.पण bank मध्‍ये येणारे व आसपास कामे असणारे वाहनचाल

लघुतम कथा...

शेजारच्‍या नानी सांगत होत्‍या, त्‍यांची आईबापावेगळी नात आज उदास आहे म्‍हणून; तिच्‍या परवाच येणार्‍या वाढदिवसासाठी घेतलेला फ्राक फारच साधा, प्‍लेन आहे, तिला छान दिसणार नाही,म्‍हणून; म्‍हंटलं, माझ्‍याकडे पाठवा तिला.. ती frock घेऊन आली. रंग छान गुलाबी होता. तिला म्‍हंटलं, माझ्‍याकडची सोनेरी लेस छान, नागमोडी लावून देते. तर, तिला ते फारच आवडले. पण लौकर देशील ना? आता मला frock छान दिसेल,म्‍हणाली.. तिला काही खरेदीसाठी गावात जायचेहोते. मी बरोबर येऊ का, विचारलं, तर ड्रायव्‍हर रामचाचांना घेऊन जाते, म्‍हणाली. मी तिला थोडेसं प्रेम आणि विश्‍वास दिला, तर छान खुलून आली होती...... काल म्‍हणे, बिग बझारमध्‍ये, तिला चिडवणार्‍या नि चोरी करणार्‍या नऊ जणांना तिने पकडून दिले होते.. आत्‍मविश्‍वास वाढताच, तिच्‍याजवळच्‍या आहे त्‍याच शक्‍तीने, केवढी मोठी कामगिरी बजावली होती....

असे आमचे लोकनेते...

Sunday, January 27, 2008 असे आमचे लोकनेते.. कालपासून डोके जरा भिरभिरलेलेच होते. शौरी आणि अमलचे बोरनहाण करायचे, तर तारखाच जमत नव्‍हत्‍या. त्‍यात दोन्‍ही मुलांच्‍या तब्‍येतींची कुरकुर. ते तिळवण मुलांनी enjoy तर करायला हवे ना! फोनाफोनी फार झाली, अन्‌ तारीख निघाली नाहीच. निघताना पुन: ह्‍यांची-माझी कटकट झालीच! ते घरी राहून आवराआवरीची बरीच कामे करणार होते. कधी नव्‍हे तो मी free hand दिल्‍यावर, त्‍यांना अगदी घाई झाली होती. कधी एकदा ही जात्‍ये, असे झाले होते. पण मला तसे दिसू तरी द्‌यायचे नव्‍हते ना! मला परत nobody loves me चे feeling आले.. झाले..लागले डोळे वाहायला! मग धडाधडा तयारी केली, नि निघाले एकदाची! भरीला बेगम अख्‍तरची गझल लावली नि शांतपणे रडत राहिले.. काल दोघांनी बेलापूरला जायचे ठरवले होते,पण मला एकटीलाच निघावे लागले.शनिवारी मोहरमची सुटी आल्‍याने बँकेची कामे रखडली, सोमवारवर गेली.ती करण्‍यासाठी ह्‍यांना घरी राहणे भाग होते. सगळं आवरताना निघायला बारा वाजले.तशी घाईही नव्‍हती, कारण मिनू चार वाजताच घरी येणार होती. आता रस्‍ता जरा बरा झालाय नि वाहनांची गर्दीही आज कमी वाटली. जरा वेळाने लक्षात आल

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

Monday, September 24, 2007 प्राण्‍यांवरचे प्रेम?.. नेहमीप्रमाणे walk साठी दोघे बाहेर पडलो.वळणाशीच आम्‍हांला बंटीने गाठले.मोठ्‍या खुशीने अंगावर उड्‍या-बिड्‍या मारुन त्‍याने आपला आनंद व्‍यक्‍त केला,नि आमच्‍याबरोबर walk ला येण्‍याचे जाहीर केले; नव्‍हे, आमच्‍यापुढे चालूही लागला.बंटी, शेजारच्‍या पाठककाकांचा कुत्रा. आता त्‍याने पाठककाकांना की काकांनी बंटीला disown केले,माहीत नाही, पण आता तो सगळ्‍या गल्‍लीचा कुत्रा आहे. वृत्तीने अतिशय प्रेमळ आहे, पण आल्‍या-गेल्‍यांवर चागलाच लक्ष ठेवून असतो.गल्‍लीत कोणी आलेले खपत नाही त्‍याला मुळीच! आमच्‍याबरोबर चालताना,मस्‍त शानमध्‍ये चालतो.वाटेत येणार्‍या लहानमोठ्‍या कुत्र्‍यांकडे अजिबात लक्ष देत नाही.कुणाच्‍या अध्‍यात-मध्‍यात नसतो.कुरापतीही काढत नाही. तर, असे आम्‍ही पाथर्डी फाट्‍याच्‍या दिशेने निघालो. साईबाबा मंदिराच्‍या अलिकडे, पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले एक साठीचे गृहस्‍थ समोरून येताना दिसले. उंचे-पुरे,एकदम आडमाप. हातात साखळीने बांधलेला, लुकडासा, बिनशेपटीचा डोबरमन;दुसर्‍या हातात एक दणकट दांडू.. छडी नव्‍हे बरं.. दांडू! पूर्वी मी पाहिलं होतं, कुत्रे फिरवण

अन्‍नदान...

Tuesday, October 9, 2007 अन्‍नदान... परवा गंगेच्‍या काठावर फिरत असताना,एका खाणावळवाल्‍याचा बोर्ड वाचला, १००/५००/१००० माणसांना अन्‍नदान येथे करता येईल.राईसप्‍लेट,पुरी-भाजी,लाडू इ.चे दरपत्रकही लावले होते. मनाला एकदम बरे वाटले की,आता पितृपक्ष, वाढदिवस इ.च्‍या निमित्ताने लोकांना जेवू घालता येईल. मग त्‍या माणसाला भेटून,चौकशी करून, advance ही देऊनआलो,आजचं जेवण नक्‍की करून...आज बरोब्‍बर साडेबाराला तिथे पोचलो.खाणावळीसमोरच गाडी ठेवली व आत गेलो.स्‍वच्‍छ स्‍वयंपाकघर,स्‍वच्‍छ भांडी,स्‍वच्‍छ टेबलं..त्‍याने बसायला सांगितले तिथे बसलो.३/४ जणांची लगबग चालली होती.त्‍यांनी हळूहळू ४/५ मोठाली भांडी टेबलावर आणून ठेवली.एका मोठ्‍या पातेल्‍यामध्‍ये बटाट्‍याचा रस्‍सा, ३ मोठी भांडी भरून पुर्‍या व एका पिशवीत ३/४ किलो बुंदीचे लाडू; भांडी, अन्‍न अगदी स्‍वच्‍छ होते. बाहेर हळूहळू वर्दळ वाढू लागली होती. लहान-मोठी मुले, उघडी-वाघडी, झिपरी मुले आत डोकावून भांड्‍यांकडे नि आमच्‍याकडे बघत होती.मुली ढगळ कपडे व झिपर्‍या सावरत भोवती फिरत होत्‍या.नदीवरही स्‍नाने करणार्‍यांची, कपडे धुणार्‍या लोकांची लगबग सुरू होती.या नाशिकच्‍या