Posts

Showing posts from May, 2019

सख्या ....

असंच असावं नातं आपलं , मृगजळ जणू , प्रपंचातलं .... थकलं भागलेलं , मन  शिणलेलं , निववून टाकेल , जळ इथलं .... कधीही  यावं , सुख  मागावं , दुःख  सांगावं , अंतरातलं .... मुक्त हसावं , सुख शिंपावं , चिंब  भिजावं , मन आपलं ... असं मृगजळ , आरसा नितळ , आनंदाचं तळं , मन आपलं ......