Posts

Showing posts from July, 2018

मैत्र ...

बंधनाच्या पलिकडे , एक नाते असावे .. नात्याला शब्दांचे , बंधन  नसावे ... प्रेमळ भावनांचा , त्याला आधार असावा .. दु:खाला तेथे थारा नसावा ... सुखाचा शिरवा , जिवाचा विसावा .. असा गोडवा , आपल्या मैत्रीत असावा ... मनातले न सांगता , तुझ्या पर्यंत पोचावे , न बोलताच तुझे शब्द , कानांवर  यावे ... ग्रीष्मात पाऊस पाडतील असे ढग असावे ... वाटेवर काटयांतूनही गुलाब फुलावे ... हात हाती नसले  , तरी सन्निध असावे .. डोळ्यांसमोर न संपणारे , एक स्वप्न असावे ... कोणती दिशा , कुठली वाट, गांव कोणतेही असावे .. आयुष्याच्या सीमेपार , मैत्र जीवाचे असावे ....

अनिवार ..

अनिवार पाणी , मिळाली वाट , तर वाहून जातं .. नाही मिळाली वाट  , तर सारं काही वाहून नेतं.....

वीण...

वीण काडी काडी ची .. वीण प्रेमाच्या  धाग्यांची .. वीण देहाची - मनाची .. वीण जन्म-जन्मांतरीची  ..

सत्य ...

सत्य  म्हणजे काय असतं , काय  असतं  सत्य .. असतं  तरी  का  सत्य , सत्य  कां  असतं ... जेवढं दिसतं डोळ्यांना , तेवढंच  सत्य  नसतं .. दृश्याच्या ही पलिकडे , सत्य  व्यापून  असतं ... नसतं सांगोवांगी.. वा नसतं कर्णोकर्णी.. श्रुतींच्या पल्याड  जातं , कवाडे  भेदुनी ... विश्वाचा गाभारा , आत परमात्मा धनी .. सत्य हुंकार  तयाचा , गूढ प्रणवाचा ध्वनी ....

उपनिषद चिंतन : - १२

        विषयांच्या  उदात्तीकरणा बरोबरच दुसरी एक कृती पांडुरंग शास्त्री  सांगतात ..ती  म्हणजे , विकारांचे  विभूतीकरण ..भक्ती  हाच जीवनाचा दृष्टिकोन आहे ..हे  सर्व  जगत्  ईश्वरमय   आहे .. जीवसृष्टी  व  जडसृष्टी ही  दोन्ही ही नमस्कारार्ह आहेत ..विषय  व विकार  ईश्वरमय आहेत ..हा दृष्टीकोण आला , की भक्ताला ही सारी क्रीडाच वाटते ..हे जग  जणू एक क्रीडांगण  आहे .... लोकवत् तु लीला कैवल्यम् । इथे  दादा  एक  छान  दृष्टांत देतात .. सर्व जगत् ईश्वरमय आहे , अशी धारणा झाल्यावर मग लाडू , जिलबी हे पदार्थ कसे बरे खाणार ? ..कारण लाडू म्हणजे भगवान ..  ही शंका विचारात घेऊनच उपनिषद सांगते , ' तेन त्यक्तेन भुंजीथा : ' म्हणजे , अहंकाराचा त्याग करूनच भोग भोगा .. तरच भोगात खरा आनंद मिळेल ..      लोकांना वाटतं की , जगात सुख आहे , पण ते भोगण्यासाठी दु:ख सहन करावे लागते ..सुखाच्या आजूबाजूला दु:ख आहे , म्हणून माणूस सुख हे दु :खाने  भोगतो ..पण गीता वेगळेच सांगते .. ' सुखेन  सुखमश्नुते ' .. सुखाने सुख भोगा ' .. वस्तुतः सुखांचा भोग घेण्याचा प्रयत्न करणे यात चूक  काहीच नाही ..पण

सख्या ..

        गच्च भरून आलेले आभाळ बघायला , दारापर्यंत  आले .... तू असे नको समजूस की , तुझी वाट बघायला , अशी उभी  राहिले .....

इवलीशी चिमणुली ...

रोज सकाळी , प्रभातफेरीच्या वेळी , बघत असे  मी ती , इवलीशी चिमणुली .. झुडपातल्या  घरट्यातून , डोकावून बघतेली , उडाया शिकवी तिला , साजुकशी माऊली .. बघता  बघता ,  भरारी  घेतली , उडाया शिकली , इवलीशी चिमणुली .. नाचाया शिकली , मुरकाया लागली , वयात  आली , इवलीशी  चिमणुली .. गोंडसशा चिमण्याच्या , नजरेत भरली , गिरक्या  घेई  , तिच्याच भवताली .. दुसरा एक हुंबाड , आला  तया वेळी , त्याच्याही मनामधी , भरली  चिमणुली .. चल  ग  ए  मुली , धमकी  अशी  दिली , गोंडस  चिमण्याची , हकालपट्टी केली .. नाजुकशी  चिमणुली , जरा नाही  भ्याली, भिरभिरून चोच त्याची , बोचकारून काढली .. इवल्याशा तळ्याच्या , काठावर आली , पंख , चोच पावले , साफसूफ केली .. घाबरून तळी , जवळ  नाही केली , असं  कधी शिकतील, माणसांच्या  मुली ? ?

उपनिषद चिंतन : - ११

       श्रीमत् शंकराचार्यांनी असा  सिद्धांत मांडला की हे  जग  असत् आहे ..World is unreal n changing .. हा सिद्धांत अगदी खराच आहे ..हे जग क्षणोक्षणी बदलते , तर त्याला खरे कसे बरे  मानता येईल ? ..जळणारी  ज्योती या क्षणी आहे ती दुसऱ्या क्षणी नाही , हे बौद्धिक दृष्टीने पटणारे आहे ..हेच त्यांनी  भावनात्मक रीतीनेही सांगितले आहे ..जसे ,  बालकाच्या हातात एखादे खेळणे आले , की ते त्यात एकाग्र होऊन जग विसरते , तसेच  भगवत्स्वरूपात जीव  एकाग्र होऊ लागला की भक्त जग विसरतो ..त्या ठिकाणी विश्व खोटे ठरते .समाधीच्या आनंदात रमून जाते ..म्हणूनच जगत् असत् आहे ,  हे आचार्यांचे विधान असत्य नाही ...         विकार वाईट  नाहीतच .. उलट  ते  जवळ  असायला  हवेत ..विषयांचे  व विकारांचे आपण इतके  उदात्तीकरण  करावे , की ते करता करता आपण सुंदर  होत जावे ..आपण  इतके  सुंदर  व्हावे , की भगवंताना  आपलेसे  व्हावे .. त्यांनी आपल्यासाठी विकारी  व्हावे ..त्यांना कधी  एकदा भक्ताला  भेटू , असे  व्हावे ..पुंडलिकाची  गोष्ट आठवते  ना ? .. त्याला  भेटण्यासाठी  भगवंत आले , तर मला वेळ  नाही  असे  सांगत , त्याने भगवं

उपनिषद चिंतन : - १०

      हीच गोष्ट  कामनांचीही ..काम , क्रोध हे  ही असायला  पाहिजेत ..कामनेमुळेच तर  जीवन पुढे सरकते ..व्यतीत  होते ..काम , क्रोध , मत्सर  हे असायलाच  पाहिजेत ..कामना ही  जीवनातील एक  अलौकिक गोष्ट  आहे ..पण तिचेही  उदात्ती- करण झाले  पाहिजे ..कामना प्रथम भोगकार्या साठी , नंतर परकार्यासाठी आणि  शेवटी  प्रभू - कार्यासाठी असायला  पाहिजे ..       क्रोध ही असायला  हवा ..सुरुवातीला स्वार्था साठी क्रोध , नंतर असत् कार्या विषयी क्रोध आणि शेवटी इंद्रियांविषयी  क्रोध निर्माण व्हावा .. ही आध्यात्मिक गोष्ट झाली ..यानंतर प्रभूवर क्रोध यावा ..संत भगवंताशी  झगडतात ..ते चित्ताची एकाग्रता करता  करता प्रगती  करतात .. त्यांना पूर्णतेचा अनुभव येईपर्यंत त्यांचे भगवंताशी गोड भांडण चाललेले  असते ..त्यांचा प्रभू वरचा  क्रोध मधुर  असतो ..चित्त  एकाग्र झाले नाही तर त्यांना राग  येतो ..असा  क्रोध असला पाहिजे..तो काही इतका वाईट  नाही .. तो क्षुद्र स्वार्थासाठी असेल तर वाईट  म्हणतात ..या क्रोधाचेही विभूती करण करायला  हवे ..उच्च स्थितीला पोचलेल्या लोकांना काम , क्रोध ,मोह हे  ईश्वरी प्रसाद वाटतात ..