उपनिषद चिंतन : - १२

        विषयांच्या  उदात्तीकरणा बरोबरच दुसरी एक कृती पांडुरंग शास्त्री  सांगतात ..ती  म्हणजे ,
विकारांचे  विभूतीकरण ..भक्ती  हाच जीवनाचा
दृष्टिकोन आहे ..हे  सर्व  जगत्  ईश्वरमय   आहे ..
जीवसृष्टी  व  जडसृष्टी ही  दोन्ही ही नमस्कारार्ह
आहेत ..विषय  व विकार  ईश्वरमय आहेत ..हा
दृष्टीकोण आला , की भक्ताला ही सारी क्रीडाच
वाटते ..हे जग  जणू एक क्रीडांगण  आहे ....
लोकवत् तु लीला कैवल्यम् ।
इथे  दादा  एक  छान  दृष्टांत देतात .. सर्व जगत्
ईश्वरमय आहे , अशी धारणा झाल्यावर मग लाडू ,
जिलबी हे पदार्थ कसे बरे खाणार ? ..कारण लाडू
म्हणजे भगवान ..  ही शंका विचारात घेऊनच उपनिषद सांगते , ' तेन त्यक्तेन भुंजीथा : '
म्हणजे , अहंकाराचा त्याग करूनच भोग भोगा ..
तरच भोगात खरा आनंद मिळेल ..
     लोकांना वाटतं की , जगात सुख आहे , पण ते
भोगण्यासाठी दु:ख सहन करावे लागते ..सुखाच्या
आजूबाजूला दु:ख आहे , म्हणून माणूस सुख हे
दु :खाने  भोगतो ..पण गीता वेगळेच सांगते ..
' सुखेन  सुखमश्नुते ' .. सुखाने सुख भोगा ' ..
वस्तुतः सुखांचा भोग घेण्याचा प्रयत्न करणे यात
चूक  काहीच नाही ..पण एकदा का मनुष्य सुख-
विषय वेचायला लागला की , स्वामित्वाची भावना
वाढते , आणि सुखोपभोग राहूनच जातो ..यासाठी
दादांनी पैशाचे उदाहरण दिले आहे ..ते म्हणतात ,
कमतरतेत भावाचे सुख आणि विपुलतेत भोगाचे
सुख असते ..पैशाने सुखे  मिळतात हे  खरे आहे .
पण पैशाच्या विपुलतेत भोगाचे सुख  मिळते , व
कमतरतेत भावाचे सुख  मिळते ..

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?