उपनिषद चिंतन : - २

ईश +आवास्यम -ईशावास्यम अशी  या  शब्दाची  फोड  आहे ..एक  तर, ईश्वराने हे  जग आच्छादि त झाले  आहे , किंवा भक्तांनी ईश्वरी भावाने जग

झाकले  आहे ..खरंच या सृष्टीत  भगवान  आहेत  का ? ..तर , होय ..भगवान सर्वव्यापी आहे ..हे जग त्यांनी  निर्माण केले  आहे ..आपल्या  प्रेमाने  हे जग झाकून टाकले आहे ..शिवाय त्यांनी या सृष्टीत प्रवेश केला आहे ..ह्यात भक्तांचे ईश्वर प्रेम दिसते ..म्हणजेच , ईशावास्यम मध्ये ईश्वराचे सृष्टी वरील व भक्तांचे ईश्वरा वरील प्रेम दिसते ..या जगातल्या  अणुरेणूत , अंतर्बाह्य भगवान आहेत..

या  उपनिषदाचा असा दृष्टिकोन आहे , की ह्या  जगात भगवान राहतो , तो  तटस्थही नाही आणि 

वेगळाही नाही...

       हे  उपनिषद वाचल्याने भोग-जीवन जगणा रा माणूस नैतिक होईल ,भाव -जीवन जगणाऱ्या 

माणसाशी सृष्टी बोलेल व आध्यात्मिक जीवन 

जगणाऱ्याला मार्गदर्शन मिळेल ...

 



Comments

Popular posts from this blog

सख्या...

सख्या ...

चिटुकली?....