आई ...

तुझी वाणी लाघवीशी । रुंजी घाले मनापाशी ।
तिला खोटं म्हणू कशी । तू आहेस खासच इथे ॥
पानं फुलं लता झाडे । प्रसन्नता चोहीकडे ।
भासे तुझेच रुपडे । तू  आहेस  नक्की इथे ॥
प्राजक्ताचा  सडा ।  घमघमतो केवडा ।
पडे सुगंधाचा वेढा ।  तू आहेस  नक्की  इथे ॥
फूल पाखरांचे गूज । चिमण्यांची कुजबूज ।
वेध लावी अलगूज । तू  आहेस  नक्की इथे ॥
ऋतु सरेल  उरेल । असशील नसशील ।
भास होतच राहील । तू आहेस  नक्की  इथे ॥

......सुषमा करंदीकर......

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?