उपनिषद चिंतन : - ५

       मात्र उपनिषदांत मांडलेली विचारधारा पूर्ण
आहे ..उपनिषद सांगते , ' पूर्णमद: पूर्णमिदम।'   मी आणि जगत या दोघांचाही एकदम विचार
करायला हवा ..कारण , मी पण श्रेष्ठ व ही सृष्टीही 
श्रेष्ठ ..मी व सृष्टी यांच्यातील संघर्षच शास्त्रकारांनी
नाहीसा केला आहे ..मी ईश्वर आहे , पण वस्तूला
तुच्छ म्हणण्याचा मला अधिकार नाही , कारण ही
सृष्टीही ईश्वर आहे ..म्हणून कोणीही हीन वा हलके
नाही ..
        आत्मनिष्ठ व वस्तुनिष्ठ या दोन्ही विचारधारा
अपूर्ण व अर्धसत्य आहेत ..आत्मनिष्ठ हे भक्त खरे
पण अर्धभक्त आहेत ..ज्यांनी ईशावास्यम विचार
स्वीकारला ते पूर्णभक्त होत ..मी पूर्ण व सृष्टीही 
पूर्ण हे ईशावास्याचे रहस्य आहे ..आपल्या वैदिक  संस्कारातही हाच विचार आढळतो ..
      सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समाचरेत ।
     वस्तूला प्रभुरूप माना , निदान वस्तू ही प्रभूची
माना .ही सृष्टी  ईश्वराने का निर्माण केली तर ,
' लोकवत्तु लीला कैवल्यम । ' लीलेचा हेतू आहे ..
क्षुद्र , अपवित्र किंवा स्वार्थी हेतू नाही ....

Comments

Popular posts from this blog

सख्या...

सख्या ...

चिटुकली?....