उपनिषद चिंतन : - ४

         आजकाल  तर आपण माणसेही आपल्यात
नीटपणे बोलत नाही ....तसे खूप बोलतो , पण
अंतःकरणापासून बोलत नाही ..हृदयाने कोणाशी तरी बोलणे ही वेगळीच गोष्ट आहे ...भाव जीवन
जगणाऱ्याशी  संपूर्ण सृष्टी बोलते ..
         आत्मनिष्ठ जीवन  जगणाऱ्या लोकांना हे
उपनिषद मार्गदर्शक आहे .. ..ते सांगते , ' मीही
ईश्वर आणि सृष्टीही  ईश्वर .. ..आज जगात  दोन
प्रकारचे विचार -प्रवाह आहेत ..आत्मनिष्ठ आणि
वस्तुनिष्ठ ..subjective आणि objective ..
आत्मनिष्ठ विचार स्वतःला प्राधान्य देतो ...मी आणि सृष्टीत मी मोठा ..सृष्टी  आणि  संस्कृती
माझ्यासाठी  आहे ..तिला मारूनही मी जगेन ..
तसेच समाज व देशही माझ्यासाठी आहे .त्यांच्या
साठी मी मरायला  तयार नाही ..
       दुसरा वस्तुनिष्ठ  विचार हा लेनिन सारख्या
महान लोकांचा आहे ..तो म्हणतो , ' समाजातून
व्यक्ती निर्माण झाली आहे ..म्हणून समाज , देश ,
राष्ट्र यांच्यासाठी  बलिदान केले  पाहिजे..' पृथ्वी
साठी आत्म्याचा , स्वतःचा त्याग करावा असे ही
विचारधारा सांगते , तर आत्मनिष्ठ विचारधारा
म्हणते  - आत्मार्थे पृथिवी त्यजेत ।
       आत्मनिष्ठ विचार स्वतःला प्राधान्य देतो ..तो
पूर्ण स्वार्थी साधकांचा विचार आहे ..तो वस्तुनिष्ठ विचारधारेला तुच्छ ठरवतो ..एकांतात बसून साधना करणारा साधक सृष्टीला तुच्छ ठरवतो ..
उलट , वस्तुनिष्ठ विचारधारा ही कार्य कर्त्यांची
विचारधारा  आहे ..ती तरुणांना समाजासाठी ,
देशासाठी मरायला सांगते ..' राष्ट्राचे काम करा ..
लग्न करु नका , मनोविकार दाबा ..'  हिटलरने
हा विचारप्रवाह स्वीकारला ..यात देश स्वतःपेक्षा
मोठा ठरतो , समाज त्याला पाठिंबा देतो .. या
विचारधारेमुळे मोठे नुकसान होते , पण समाज
त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो व आत्मनिष्ठ विचार
प्रवाहाची टिंगल होते ..
        पण या दोन्ही विचारधारा अपूर्ण आहेत , कारण त्यांत अनुक्रमे सृष्टीला व व्यक्तीला गौण
ठरवले आहे ..

Comments

Popular posts from this blog

सख्या...

सख्या ...

चिटुकली?....