सख्या ....


माझी वाट खाचा -खळग्यांची ,
तुझी  वाट  नागमोडी ,
अचानक भेटीची एक घडी ..

अजुनी नुसताच धरलाय हात ,
नाही बोटांची गुंतागुंत ,
सोडून देऊ उशीर होण्याच्या आत ..

नको वाटांची सांधेजोड ,
नको भावनांची पडझड ,
नको मनांची घडमोड ..

नकोच ती तडातड ,
तू धर ऐलथड ,
मी धरते पैलथड .....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?