सर्व विश्व ईश्वरमय आहे हे ज्ञान आहे , पण अनुभव नसल्याने आपल्याला विषय व विकार हे भयंकर वाटतात .. या विषयांना व विकाराना ही ईशावास्यम माना असे प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य फक्त वेदांमध्येच आहे ..गीता सांगते : - धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ ॥ गीतेने यात कामाचा स्वीकार केला आहे , त्याला विभूती मानण्यास सांगितले आहे ..कारण , हे विषय व विकारही भगवंतानेच निर्माण केले आहेत..त्याने ते निर्माण करुन जीवाला कृतार्थ बनविले आहे .. भगवंतापासून वेगळे झाल्यावर ते चैतन्य कोठल्या आधारावर जगणार?त्याचे जीवन कसे चालणार? यासाठी भगवंताने ही खेळणी दिली आहेत .. विषय आणि विकार यांचा तिरस्कार करुन ते जाणार नाहीत ..त्यांना भगवंताने निर्माण केले आहे , म्हणून ते सुंदर आहेत ..त्यांचीही आपणास गरज आहे ..नको म्हणून ते जाणार नाहीत.. ते विषय आहेत हे समजूनच त्यांचे सेवन करायला पाहिजे .. हे जगत कोणाचे ? भगवंताचे ..मी कोणाचा ? भगवंताचा .. तसेच हे विषय व विकार भगवंताने निर्माण केलेले असल्यामुळे , त्यांची निर्भत्सना करुन चालणार नाही .. जे ती करतात त्यांना या जगाचे रह
Monday, September 24, 2007 प्राण्यांवरचे प्रेम?.. नेहमीप्रमाणे walk साठी दोघे बाहेर पडलो.वळणाशीच आम्हांला बंटीने गाठले.मोठ्या खुशीने अंगावर उड्या-बिड्या मारुन त्याने आपला आनंद व्यक्त केला,नि आमच्याबरोबर walk ला येण्याचे जाहीर केले; नव्हे, आमच्यापुढे चालूही लागला.बंटी, शेजारच्या पाठककाकांचा कुत्रा. आता त्याने पाठककाकांना की काकांनी बंटीला disown केले,माहीत नाही, पण आता तो सगळ्या गल्लीचा कुत्रा आहे. वृत्तीने अतिशय प्रेमळ आहे, पण आल्या-गेल्यांवर चागलाच लक्ष ठेवून असतो.गल्लीत कोणी आलेले खपत नाही त्याला मुळीच! आमच्याबरोबर चालताना,मस्त शानमध्ये चालतो.वाटेत येणार्या लहानमोठ्या कुत्र्यांकडे अजिबात लक्ष देत नाही.कुणाच्या अध्यात-मध्यात नसतो.कुरापतीही काढत नाही. तर, असे आम्ही पाथर्डी फाट्याच्या दिशेने निघालो. साईबाबा मंदिराच्या अलिकडे, पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले एक साठीचे गृहस्थ समोरून येताना दिसले. उंचे-पुरे,एकदम आडमाप. हातात साखळीने बांधलेला, लुकडासा, बिनशेपटीचा डोबरमन;दुसर्या हातात एक दणकट दांडू.. छडी नव्हे बरं.. दांडू! पूर्वी मी पाहिलं होतं, कुत्रे फिरवण
ईश +आवास्यम -ईशावास्यम अशी या शब्दाची फोड आहे ..एक तर, ईश्वराने हे जग आच्छादि त झाले आहे , किंवा भक्तांनी ईश्वरी भावाने जग झाकले आहे ..खरंच या सृष्टीत भगवान आहेत का ? ..तर , होय ..भगवान सर्वव्यापी आहे ..हे जग त्यांनी निर्माण केले आहे ..आपल्या प्रेमाने हे जग झाकून टाकले आहे ..शिवाय त्यांनी या सृष्टीत प्रवेश केला आहे ..ह्यात भक्तांचे ईश्वर प्रेम दिसते ..म्हणजेच , ईशावास्यम मध्ये ईश्वराचे सृष्टी वरील व भक्तांचे ईश्वरा वरील प्रेम दिसते ..या जगातल्या अणुरेणूत , अंतर्बाह्य भगवान आहेत.. या उपनिषदाचा असा दृष्टिकोन आहे , की ह्या जगात भगवान राहतो , तो तटस्थही नाही आणि वेगळाही नाही... हे उपनिषद वाचल्याने भोग-जीवन जगणा रा माणूस नैतिक होईल ,भाव -जीवन जगणाऱ्या माणसाशी सृष्टी बोलेल व आध्यात्मिक जीवन जगणाऱ्याला मार्गदर्शन मिळेल ...
Comments