Posts

सख्या ...

हे असं अवखळपण , चंचलपण .. कधी  पानं , फुलं , तारे , कधी स्वप्नं वेचताना , हसून बघत होतास .. उतरणीवर कधी घसरले , तेव्हांही ,  गालात हसून , बोट दिलेस धरायला .. दुस्तर वाटेवर कधी कचरले तर , डोळ्यांनी धीर दिलास .. पाठीवर हात ठेवून , झुंजायला बळ दिलेस  .. हात सुटले हातातून , पण साथ नाही सरली , तू आहेसच खास , मागेपुढे ,  आसपास .. दिसला नाहीस कधी , पण जाणवतो तुझा वास .. आता जीर्ण झालीय श्वासांची माळ , जेव्हां ओघळेल  तेव्हां , असशील  ना  आसपास ... ?

विनंती ...

लाल कुंकू , हळद पिवळी , सुखी संसाराची सुबक रांगोळी ... रांगोळीत उमटली पावलं गौरीची , शिकल्या सवरल्या , जाणत्या लेकीची ... वेळ विवाहाची , सप्तपदी चालण्याची , मायेच्या  कोंदणात सुखस्वप्ने रेखायची ... आपणां सर्वांना विनंती आग्रहाची, अक्षतांच्या समवेत आशीर्वाद देण्याची ...

सख्या ..

किती  खात्री  असते , सगळं मुठीत असल्याची .. तरी , आयुष्य हातातून निसटतंच ....

सख्या ...

तू म्हणतोस , सारखं भांडण होतं आपलं .. तुझं मला पटत नाही , माझं तुला पटत नाही .. पाच दहा पंधरा वीस , चाळीस वर्षे होऊन गेली .. आता तर माझ्या मनातलंही वाचून , भांडतेस , उत्तरं देतेस तू ....   ...

सख्या ...

तूच उगीच दुखवलंस , डोळ्यांत अश्रु उभे राहिले .. अश्रूंच्या आडून तुझं हंसू चमकलं , डोळ्यांत स्वप्नांचं इंद्रधनू  उमटलं .. चिडव , रडव किती  ते , रडणारच नाही ..ठरवून .. इंद्रधनूतली स...

सख्या ...

तू सांग , नाही तर , सांगू नकोस काही .. ते तुझ्या -माझ्यातलं, विरूनसं गेलंय कांही ... आठवतंय ना पाणंदीवर ? गवताच्या पात्यांवर , चमकणारं ते  दहिवर.. त्यांच्या चिमुकल्या आकाशात, सारं विश्व थरथरत राही .. त्यांत भिजत पावलं , तुझीही , माझीही .. तुझ्या ओल्या पावलांचा , आज माग सापडत नाही .. ते तुझ्या -माझ्यातलं , विरूनसं गेलंय काही .... किती  गूज करत , बसलो त्या कातळावर .. दाखवलं होतंस मला , ते रानफूल  लाजणारं.. खुडलं नाहीस  तूही , नाही खुडलं मीही .. कुठे दूर वाऱ्याबरोबर , उडून गेलं का तेही ? गंध मात्र माझ्याभोवती , अजून दरवळत राही ... तू सांग,  नाहीतर , सांगू नकोस काही .. ते तुझ्या माझ्यातलं , विरूनसं गेलंय कांही .......

सख्या ....

माझी वाट खाचा -खळग्यांची , तुझी  वाट  नागमोडी , अचानक भेटीची एक घडी .. अजुनी नुसताच धरलाय हात , नाही बोटांची गुंतागुंत , सोडून देऊ उशीर होण्याच्या आत .. नको वाटांची सांधेजोड , नको...