सख्या ...

तू म्हणतोस ,
सारखं भांडण होतं आपलं ..
तुझं मला पटत नाही ,
माझं तुला पटत नाही ..
पाच दहा पंधरा वीस ,
चाळीस वर्षे होऊन गेली ..
आता तर माझ्या मनातलंही वाचून ,
भांडतेस , उत्तरं देतेस तू ....
           * *
मी  म्हणते , मग काय झालं ?
भांडलं तर कुठे  बिघडलं ?
सारखे आपण एकत्र असतो ,
आपल्या या  चिमुकल्या खोपीत ..
धारदार , टोकदार , अस्सल ,
आपली लयच वेगळी ..
जवळ , आणखी जवळ येऊ ,
तर  कक्षा छेदणारच की  नाही ?
अंतर  कमी  तर  घर्षण होईल ,
अंतर  वाढलेलं आपल्याला  चालेल ? ..

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?