कबीर...

आकाशात ढग येतात.ढगांमधून शुध्‍द पाणी बरसू लागतं.ते पाणी जमिनीवर
येतं.पण जमिनीवर येता-येताच ते अशुध्‍द होऊ लागतं.हवेतील धुळीचे कण
पाण्‍याच्‍या थेंबांना चिकटतात. मग जमिनीवर पडल्‍यानंतर सर्व प्रकारची घाण
त्‍या थेंबांना लागते.आणि मग ते पाणी समुद्राच्‍या दिशेने वाहू लागतं.जसजसं
ते पुढे वाहू लागतं तसतशी गावांमधील,नगरांमधील.शहरांमधील घाण त्‍याच्‍यात
मिसळू लागते.मेघांमधून तर शुध्‍द जल निघालेलं होतं,परमात्‍म्‍याचं होतं...
पण रस्‍त्‍यामध्‍ये जी सगळी घाण गोळा केली आहे,ती तुमची आहे.आणि जेव्‍हां
नदी परत समुद्रामध्‍ये उतरेल,तेव्‍हां कोणत्‍या तोंडाने तुम्‍ही म्‍हणाल की मी
समर्पण करतो आहे? तेव्‍हां तुम्‍ही हेच म्‍हणाल,जे कबीर म्‍हणत आहेत.....
"मेरा मुझमें कुछ नहीं,जो कछु है सौ तोर,तेरा तुझको सौंपते क्‍या लागत है
मोर." ही समर्पणाची स्‍थिती आहे.दुर्गुण माझे आहेत,सद्‌गुण तुझे आहेत.
दोन्‍ही तुझ्‍याच पायांशी ठेवून देतो.तूच सांभाळ,जे तुला करायचं असेल ते कर.
आणि ज्‍या दिवशी माणूस अशा प्रकारे परमात्‍म्‍याशी समर्पित होऊन जातो,त्‍या
दिवशी सर्व दुर्गुण सद्‌गुणांच्‍या उपयोगी पडतात.अंधार प्रकाशाची पार्श्‍वभूमी बनतो.
क्रोध करुणेमध्‍ये रुपांतरित होतो.मोहाचं रूप बदलतं आणि तो प्रेम होउन जातो.
सर्व काही बदलून जातं.समर्पित करता क्षणी,अहंकार नष्‍ट होता क्षणी,सागरामध्‍ये
मिळून जाता क्षणी सर्व शुध्‍द होऊन जातं.पुन्‍हां मेघ जमू लागतात.सागरामधून
परम शुध्‍द होऊन,पुन्‍हां बरसण्‍याची तयारी होऊ लागते.जगणं,प्रयत्‍न नाही आहे,
समर्पण आहे,let go आहे,सोडून देणं आहे.जेवढं लढाल तेवढे अडचणीत याल.
अहंकार म्‍हणजे संघर्ष आहे.समर्पण ही संघर्षहीन अवस्‍था आहे. सीमा तर
अहंकाराला असते.समर्पणाला कसलीच सीमा नसते.अहंकार गळून पडता क्षणी
तुम्‍ही असीम होऊन जाता.आतापर्यंत तुम्‍ही भिंतींमध्‍ये कोंडलेलं आकाश होतात,
आता तुमच्‍या सर्व बाजूंना पसरलेलं आकाश तुम्‍हीच आहात..मेरा मुझमें कुछ नहीं....

Comments

sonal m m said…
hi aai, masta aahe he lalit lekhan.
halli tula baki kashala vel nasel na milat :)
tu halli mhanunach haravleli vattes bahudha...veglyach plane var rahetes tu aatasha...
sushama said…
barobar olakhlas minya..

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?