अंतर तर नाही पडलंय आपल्यात .. मग ते सारे शब्द कुठे गेले ? गंध दरवळतोय इथे आसपास , मग बकुळफूल कुठे लपले ? आत्ता आत्ताच तर , तू दिलेले रंग इथे सांडले .. ते घेऊन आलेले फुलपाख...
हे असं अवखळपण , चंचलपण .. कधी पानं , फुलं , तारे , कधी स्वप्नं वेचताना , हसून बघत होतास .. उतरणीवर कधी घसरले , तेव्हांही , गालात हसून , बोट दिलेस धरायला .. दुस्तर वाटेवर कधी कचरले तर , डोळ्यांनी धीर दिलास .. पाठीवर हात ठेवून , झुंजायला बळ दिलेस .. हात सुटले हातातून , पण साथ नाही सरली , तू आहेसच खास , मागेपुढे , आसपास .. दिसला नाहीस कधी , पण जाणवतो तुझा वास .. आता जीर्ण झालीय श्वासांची माळ , जेव्हां ओघळेल तेव्हां , असशील ना आसपास ... ?
तू म्हणतोस , सारखं भांडण होतं आपलं .. तुझं मला पटत नाही , माझं तुला पटत नाही .. पाच दहा पंधरा वीस , चाळीस वर्षे होऊन गेली .. आता तर माझ्या मनातलंही वाचून , भांडतेस , उत्तरं देतेस तू .... ...