सख्या ....

असंच असावं
नातं आपलं ,
मृगजळ जणू ,
प्रपंचातलं ....

थकलं भागलेलं ,
मन  शिणलेलं ,
निववून टाकेल ,
जळ इथलं ....

कधीही  यावं ,
सुख  मागावं ,
दुःख  सांगावं ,
अंतरातलं ....

मुक्त हसावं ,
सुख शिंपावं ,
चिंब  भिजावं ,
मन आपलं ...

असं मृगजळ ,
आरसा नितळ ,
आनंदाचं तळं ,
मन आपलं ......

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

उपनिषद चिंतन : - ६

प्राण्‍यांवरचे प्रेम...?