Posts

लघुतम कथा...

शेजारच्‍या नानी सांगत होत्‍या, त्‍यांची आईबापावेगळी नात आज उदास आहे म्‍हणून; तिच्‍या परवाच येणार्‍या वाढदिवसासाठी घेतलेला फ्राक फारच साधा, प्‍लेन आहे, तिला छान दिसणार नाही,म्‍हणून; म्‍हंटलं, माझ्‍याकडे पाठवा तिला.. ती frock घेऊन आली. रंग छान गुलाबी होता. तिला म्‍हंटलं, माझ्‍याकडची सोनेरी लेस छान, नागमोडी लावून देते. तर, तिला ते फारच आवडले. पण लौकर देशील ना? आता मला frock छान दिसेल,म्‍हणाली.. तिला काही खरेदीसाठी गावात जायचेहोते. मी बरोबर येऊ का, विचारलं, तर ड्रायव्‍हर रामचाचांना घेऊन जाते, म्‍हणाली. मी तिला थोडेसं प्रेम आणि विश्‍वास दिला, तर छान खुलून आली होती...... काल म्‍हणे, बिग बझारमध्‍ये, तिला चिडवणार्‍या नि चोरी करणार्‍या नऊ जणांना तिने पकडून दिले होते.. आत्‍मविश्‍वास वाढताच, तिच्‍याजवळच्‍या आहे त्‍याच शक्‍तीने, केवढी मोठी कामगिरी बजावली होती....

असे आमचे लोकनेते...

Sunday, January 27, 2008 असे आमचे लोकनेते.. कालपासून डोके जरा भिरभिरलेलेच होते. शौरी आणि अमलचे बोरनहाण करायचे, तर तारखाच जमत नव्‍हत्‍या. त्‍यात दोन्‍ही मुलांच्‍या तब्‍येतींची कुरकुर. ते तिळवण मुलांनी enjoy तर करायला हवे ना! फोनाफोनी फार झाली, अन्‌ तारीख निघाली नाहीच. निघताना पुन: ह्‍यांची-माझी कटकट झालीच! ते घरी राहून आवराआवरीची बरीच कामे करणार होते. कधी नव्‍हे तो मी free hand दिल्‍यावर, त्‍यांना अगदी घाई झाली होती. कधी एकदा ही जात्‍ये, असे झाले होते. पण मला तसे दिसू तरी द्‌यायचे नव्‍हते ना! मला परत nobody loves me चे feeling आले.. झाले..लागले डोळे वाहायला! मग धडाधडा तयारी केली, नि निघाले एकदाची! भरीला बेगम अख्‍तरची गझल लावली नि शांतपणे रडत राहिले.. काल दोघांनी बेलापूरला जायचे ठरवले होते,पण मला एकटीलाच निघावे लागले.शनिवारी मोहरमची सुटी आल्‍याने बँकेची कामे रखडली, सोमवारवर गेली.ती करण्‍यासाठी ह्‍यांना घरी राहणे भाग होते. सगळं आवरताना निघायला बारा वाजले.तशी घाईही नव्‍हती, कारण मिनू चार वाजताच घरी येणार होती. आता रस्‍ता जरा बरा झालाय नि वाहनांची गर्दीही आज कमी वाटली. जरा वेळाने लक्षात आल...

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

Monday, September 24, 2007 प्राण्‍यांवरचे प्रेम?.. नेहमीप्रमाणे walk साठी दोघे बाहेर पडलो.वळणाशीच आम्‍हांला बंटीने गाठले.मोठ्‍या खुशीने अंगावर उड्‍या-बिड्‍या मारुन त्‍याने आपला आनंद व्‍यक्‍त केला,नि आमच्‍याबरोबर walk ला येण्‍याचे जाहीर केले; नव्‍हे, आमच्‍यापुढे चालूही लागला.बंटी, शेजारच्‍या पाठककाकांचा कुत्रा. आता त्‍याने पाठककाकांना की काकांनी बंटीला disown केले,माहीत नाही, पण आता तो सगळ्‍या गल्‍लीचा कुत्रा आहे. वृत्तीने अतिशय प्रेमळ आहे, पण आल्‍या-गेल्‍यांवर चागलाच लक्ष ठेवून असतो.गल्‍लीत कोणी आलेले खपत नाही त्‍याला मुळीच! आमच्‍याबरोबर चालताना,मस्‍त शानमध्‍ये चालतो.वाटेत येणार्‍या लहानमोठ्‍या कुत्र्‍यांकडे अजिबात लक्ष देत नाही.कुणाच्‍या अध्‍यात-मध्‍यात नसतो.कुरापतीही काढत नाही. तर, असे आम्‍ही पाथर्डी फाट्‍याच्‍या दिशेने निघालो. साईबाबा मंदिराच्‍या अलिकडे, पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले एक साठीचे गृहस्‍थ समोरून येताना दिसले. उंचे-पुरे,एकदम आडमाप. हातात साखळीने बांधलेला, लुकडासा, बिनशेपटीचा डोबरमन;दुसर्‍या हातात एक दणकट दांडू.. छडी नव्‍हे बरं.. दांडू! पूर्वी मी पाहिलं होतं, कुत्रे फिरवण...

अन्‍नदान...

Tuesday, October 9, 2007 अन्‍नदान... परवा गंगेच्‍या काठावर फिरत असताना,एका खाणावळवाल्‍याचा बोर्ड वाचला, १००/५००/१००० माणसांना अन्‍नदान येथे करता येईल.राईसप्‍लेट,पुरी-भाजी,लाडू इ.चे दरपत्रकही लावले होते. मनाला एकदम बरे वाटले की,आता पितृपक्ष, वाढदिवस इ.च्‍या निमित्ताने लोकांना जेवू घालता येईल. मग त्‍या माणसाला भेटून,चौकशी करून, advance ही देऊनआलो,आजचं जेवण नक्‍की करून...आज बरोब्‍बर साडेबाराला तिथे पोचलो.खाणावळीसमोरच गाडी ठेवली व आत गेलो.स्‍वच्‍छ स्‍वयंपाकघर,स्‍वच्‍छ भांडी,स्‍वच्‍छ टेबलं..त्‍याने बसायला सांगितले तिथे बसलो.३/४ जणांची लगबग चालली होती.त्‍यांनी हळूहळू ४/५ मोठाली भांडी टेबलावर आणून ठेवली.एका मोठ्‍या पातेल्‍यामध्‍ये बटाट्‍याचा रस्‍सा, ३ मोठी भांडी भरून पुर्‍या व एका पिशवीत ३/४ किलो बुंदीचे लाडू; भांडी, अन्‍न अगदी स्‍वच्‍छ होते. बाहेर हळूहळू वर्दळ वाढू लागली होती. लहान-मोठी मुले, उघडी-वाघडी, झिपरी मुले आत डोकावून भांड्‍यांकडे नि आमच्‍याकडे बघत होती.मुली ढगळ कपडे व झिपर्‍या सावरत भोवती फिरत होत्‍या.नदीवरही स्‍नाने करणार्‍यांची, कपडे धुणार्‍या लोकांची लगबग सुरू होती.या नाशिकच्‍या...

संध्‍या-सागर..

वेगवेगळ्‍या रंगांनी तरुण बनलेल्‍या सागराने संध्‍येला विचारले, "हे संध्‍या,तुझ्‍यामुळेच माझ्‍या सबंध शरीराचा रंग बदलतो आणि मला विलक्षण सौंदर्य प्राप्‍त होते. मला तुला एवढेच सांगायचे आहे की,माझ्‍यात रूप नाही की रंग..माझा देह तरल आहे.. माझ्‍या देहाचा कण नि कण खरबरीत आहे.असे असून तू माझ्‍यावर का झुकतेस?" संध्‍येने उत्तर दिले,"तू कसा आहेस हे मला सारे ठाऊक आहे.तुझ्‍या स्‍वभावाचा काही अंत नाही. क्षणात वेडा होऊन नाचशील,तर क्षणात निराश होऊन बसशील.तू खारट आहेस.पण मला माहीत आहे, तुझ्‍यापाशी फक्‍त दोन वस्‍तू आहेत.एक म्हणजे,तू सार्‍या जगातला कचरा एकत्र करून त्‍याचे अमृत बनवतोस. दुसरे म्‍हणजे,तुझ्‍यात जो अफाटपणा नि मस्‍ती आहे,तशी कोणातही नाही.आणि म्‍हणून मी माझे सर्वस्‍व तुला अर्पण करते..बोल,आणखी काही म्‍हणायचेय?" सागर मुका झाला......

प्रकाश आणि काळोख

एकदा प्रकाशाचे आणि काळोखाचे श्रेष्‍ठत्वावरून भांडण झाले.प्रकाशाने काळोखाला म्‍हंटले, "काय रे,सगळे काही 'गुडुप' करणारा स्‍वभाव तुझा! मी बघ कसा, सर्व काही 'उजळ' करणारा..सर्वांना दृष्‍टी देणारा".. काळोख शांतपणे म्‍हणाला, "कशाला हवास रे तू? फक्‍त काळे-गोरे बघायला? दृष्‍टी देऊन दृष्‍टिकोण वजा करणारा? मी बघ कसा,माझ्‍या मिठीत सामावून घेतो सर्वांना..माझ्‍या उपस्‍थितीत सांगू शकणार का, कोण काळा आणि कोण गोरा ते? ..." प्रकाश निरुत्तर झाला, आणि काळोखात सामावून गेला....

कबीर...

आकाशात ढग येतात.ढगांमधून शुध्‍द पाणी बरसू लागतं.ते पाणी जमिनीवर येतं.पण जमिनीवर येता-येताच ते अशुध्‍द होऊ लागतं.हवेतील धुळीचे कण पाण्‍याच्‍या थेंबांना चिकटतात. मग जमिनीवर पडल्‍यानंतर सर्व प्रकारची घाण त्‍या थेंबांना लागते.आणि मग ते पाणी समुद्राच्‍या दिशेने वाहू लागतं.जसजसं ते पुढे वाहू लागतं तसतशी गावांमधील,नगरांमधील.शहरांमधील घाण त्‍याच्‍यात मिसळू लागते.मेघांमधून तर शुध्‍द जल निघालेलं होतं,परमात्‍म्‍याचं होतं... पण रस्‍त्‍यामध्‍ये जी सगळी घाण गोळा केली आहे,ती तुमची आहे.आणि जेव्‍हां नदी परत समुद्रामध्‍ये उतरेल,तेव्‍हां कोणत्‍या तोंडाने तुम्‍ही म्‍हणाल की मी समर्पण करतो आहे? तेव्‍हां तुम्‍ही हेच म्‍हणाल,जे कबीर म्‍हणत आहेत..... "मेरा मुझमें कुछ नहीं,जो कछु है सौ तोर,तेरा तुझको सौंपते क्‍या लागत है मोर." ही समर्पणाची स्‍थिती आहे.दुर्गुण माझे आहेत,सद्‌गुण तुझे आहेत. दोन्‍ही तुझ्‍याच पायांशी ठेवून देतो.तूच सांभाळ,जे तुला करायचं असेल ते कर. आणि ज्‍या दिवशी माणूस अशा प्रकारे परमात्‍म्‍याशी समर्पित होऊन जातो,त्‍या दिवशी सर्व दुर्गुण सद्‌गुणांच्‍या उपयोगी पडतात.अंधार प्रकाशाची पार्श...