कबीर...

"मन परतीत न प्रेमरस,ना कछु तनमे ढंग,ना जानौ उस पीवको,क्‍यों कर
रहसी रंग.." मनामध्‍ये ना काही प्रतीति आहे,ना कोणता अनुभव आहे,ना
कोणता प्रेमाचा रंग आहे." ना कछु तनमे ढंग" शरीरही काही सुंदर नाही.
कोणत्‍या तोंडाने तुझ्‍यासमोर येऊ? तुझं दार ठोठावण्‍यासाठी धैर्य कोठून आणू?
कोणत्‍या पात्रतेचा दावा करू? आणि, ना तुला कधी पाहिलं आहे,ना कधी
जाणलं आहे.प्रियकराशी कधी ओळखच झाली नाही,त्‍या प्रियतमाशी मीलन
कधी झालंच नाही,तर मला कसं समजणार की कोणता रंग,कोणतं रहस्‍य,
कोणता आनंद प्राप्‍त होणार आहे तुझ्‍या द्‍वारावर? कशी तयारी करू?
कोणत्‍या रंगाने स्‍वत:ला रंगवू? तुझ्‍या द्‍वाराशी कोणाचा स्‍वीकार होतो,
हे मला कसं कळेल? भक्‍ताची हीच भावना असते की,माझ्‍यामध्‍ये माझं
असं जर काही असेल तर ते माझे दुर्गुण आहेत..अंधार आहे.माझे सगळे
रोग,सगळा त्रास आहे.माझ्‍यामध्‍ये चुकीच्‍या गोष्‍टीच खूप आहेत,आणि जे
काही चांगलं आहे त्‍याच्‍याबद्‍दल मी काय सांगू?
"मेरा मुझमे कुछ नहीं,जो कछु है सो तोर,
तेरा तुझको सौंपते,क्‍या लागत है मोर..."
जर काही चांगलं असेल तर तो तुझा सुगंध आहे, तुझं दान आहे,ती तुझीच
जीवनधारा आहे, तूच आहेस.समर्पणाची हीच भावस्‍थिती आहे.. दुर्गुण माझे
आहेत,सद्‍गुण तुझे आहेत. आता सर्वच सोडून देतो.
तू स्‍वीकार कर.तेवढंच पुरेसं आहे....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २