कबीर...

"सुरति करौ मेरे सांइया,हम हैं भवजल मांहि्..आपे ही बह जाएंगे,जे नहिं पकरौ बांहि...." कबीर सांगतात की तुम्‍ही सुरतीने भरून जा,परमात्‍म्‍याच्‍या स्‍मरणाने भरून जा.जसजशी त्‍याची आठवण दाट होत जाईल ,तसतसा तुमचा अहंकाराचा भाव कमी कमी होत जाईल."प्रेम गली अति सांकरी,तांमे दो न समाहि.."ही प्रेमाची वाट फार निरुंद आहे,फार बारीक आहे. एकतर परमात्‍म्‍याचे स्‍मण तरी शिल्‍लक राहील,किंवा अहंकार तरी! दोन्‍ही स्‍मरणं एकावेळी असूच शकत नाहीत.परमात्‍म्‍याची
प्राप्‍ती हवी असेल तर स्‍वत:ला सोडावं लागतं.स्‍वत:ला पकडायचं असेल तर परमात्‍मा हातून सुटलाच,समजा!! पण ही सुरति साधावी कशी? कारण,अहंकार सारून सुरति साधली की.त्‍या सुरतीचाच एकनवीन अहंकार निर्माण होतो.कबीर पहिलं सूत्र सांगतात की,तुम्‍ही सुरतीने भरून जा.पण सुरतीला असं कवटाळू नका की,सुरतीमुळेच अहंकार निर्माण होईल.या अहंकाराची शकयताच सपून जावी,म्‍हणून कबीर दुसरं सूत्र सांगतात, " सुरति करौ मेरे सांइया" ते परमात्‍म्‍याला सांगतात की, मी तर तुझ्‍या स्‍मरणाने भरून जायचा प्रयत्‍न करतो आहे,पण तेवढं पुरेसं नाही.मी एकटा भवसागर पार करु शकणार नाही.मी बुडूनच जाईन.माझा त्‍याग,माझी पूजा,माझी साधना पुरेशी नाही.मी आंधळा,सगळ्‍या बाजूंनी बेचैन आणि ग्रासलेला,अंधारात तुला हाक मारतो आहे.पण माझा आवाज तुझ्‍यापर्यंत पोचणार तरी आहे का ? ना तुझा पत्ता मला ठाऊक,ना तुझं घर मला माहीत.मी हाक मारतो,पण त्‍या हाकेतही कुठे ना कुठे माझा संदेह लपलेला असतो.मी हा असा,माझी सुरतीही पूर्ण नाही आहे.तिचेही तुकडेच तुकडे आहेत.कधी विसरून जातो,तर कधी स्‍मरण करतो.म्‍हणून,"सुरति करौ मेरे सांइया,हम हैं भवजल मांहि" हे प्रभू,तुलाही माझी आठवण करावी लागेल.समुद्र मोठा आहे,जग फर सूक्ष्‍म आहे.किनारा दृष्‍टीला पडतच नाही.तरून जाण्‍यापेक्षा बुडण्‍याची शक्‍यताच जास्‍त. स्‍वत:च्‍या सुरतीची नाव बनवून तुझ्‍या किनार्‍याला पोचून जाऊ,हे कठीण दिसतंय.म्‍हणून तुझा आधार हवाच.नाही तर,"आपेहि बह जाएंगे,जे नहिं पकरी बांहि" हा आपे शब्‍द फार छान आहे.याचे दोन अर्थ होउ शकतात.
एक म्‍हणजे,आमचे आम्‍हीच असलो तर वाहून जाऊ. आणि आपे चा दुसरा अर्थ अहंकार.हा जो मीपणाचा भाव आहे, त्‍यानेच आम्‍ही वाहून जाऊ. म्‍हणून तू हात दे......

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २