कबीर..

"अवगुन मेरे बापजी,बकस गरीब निवाज, जे मैं पूत कपूत हों, तउ पिताको
लाज.." मला माहीत आहे,माझ्‍यात अवगुण तर आहेतच! तुलाही माहीत
नसतील,असे दुर्गुण माझ्‍यात आहेत.तू मला मदत करावीस ती मी तिच्‍या
योग्‍य आहे,म्‍हणून नव्‍हे.मी तेवढी पात्रता कमावली आहे,म्‍हणून तू हात पुढे
कर असे मी म्‍हणतच नाही आहे.माझी कुठली एवढी पात्रता? पण तू गरीबांचा
त्राता आहेस.ज्‍यांच्‍याजवळ काहीही नाही,त्‍यांच्‍यावर तू दया करतोस.तुझी करुणा
अपार आहे.मी तुझ्‍या त्‍या करुणेला साद घालतो आहे.हे जे विनम्रतेचं बोलणं आहे,
हा जो अहंकाराचा स्‍पष्‍ट स्‍वीकार आहे,हेच विनम्र भक्‍ताचं लक्षण आहे.अहंकाराला
अगदी मुळापासून नष्‍ट करण्‍याचा हा प्रयत्‍न आहे.तपस्‍वी हिशोब ठेवतो किती
तपश्‍चर्या केली त्‍याचा.साधक हिशोब ठेवत असतो,किती उपवास केले,किती पूजा
केल्‍या,किती मंत्रजप केला,त्‍याचा.पण भक्‍ताची भावना वेगळीच असते.त्‍याला
स्‍वत:च्‍या अवगुणांची जाणीव असते.आपण ते संपवू शकलो नाही,संपवता येणार
नाहीत,हेही त्‍याला माहीत असते.मला ठाऊक आहे,सुपुत्र होण्‍याचा दावा मी करू
शकत नाही.मी कुपुत्र असण्‍याचीच शक्‍यता जास्‍त आहे.पण ती माझीच चूक आहे,
त्‍यात तुला लाज वाटण्‍यासारखे काहीच नाही.मुलगा कुपुत्र आहे की सुपुत्र आहे
यानेही काही फरक पडत नाही.पित्‍याच्‍या प्रेमामध्‍ये काहीच फरक पडत नाही.
आणि जर फरक पडला तर ते पित्‍याचे प्रेमच नाही्.उलट,कुपुत्राबद्‍दल पित्‍याच्‍या
मनात अधिक प्रेम,अधिक ममता असते.

Comments

Popular posts from this blog

सख्या ...

सख्या...

चिटुकली?....