Posts

Showing posts from 2010

लालबाग-परळ... -२-

फटाफट एकेक खाती बंद करत जाणारा खेतानशेट॥ त्याची बावळट, शेमळट मुद्रा, पण क्रूर, नीच वृत्ती.. त्याचा आणखीनच नीच जावई.. नाडली जाणारी कामगार मंडळी.. वाढत जाणारी लाचारी, चोऱ्या, लबाडी.. खरंच काही चांगलं, भलं उरलंच नाही का? तोतरा स्पीडब्रेकर नि त्याची सेना.. मर्कटसेनाच ती .. त्यांचे दारू पिणे, बंदुका चालवणे,शिवीगाळ करणे, त्या गरीब माणसाला खुर्चीला बांधून जो काही अनन्वित छळ केला, मारहाण,चावणे.. शीः .. पोटात ढवळून आले.. हे कमी म्हणून की काय, त्याला गोळ्या घालताना त्यांचे हिडिस हासणे.. आणि गोळ्या घालणे काय ते, एका गोळीत जीव गेला तरी वीस-तीस गोळ्या मारणे..प्रत्येक वेळी गोळी लागते तिथे उसळणारे रक्ताचे कारंजे..अरे, किती, किती दाखवाल? सूचक, प्रतीकात्मक काहीच नाही? तेच प्रेमाच्या बाबतीत..नुसते हिसकावणे,ओरबाडणे, फसवणूक, व्यभिचार..आणि त्याला लाचार मान्यता, प्रत्यक्ष आईचीही!! नरूवर गोळ्या झाडल्या जातानाही नुसताच आक्रोश.. राग का नाही? हवा तिथे राग नाहीच.. आणि नको तिथे भीकमाग्या राग..आणखी ती सोज्वळ सई ताम्हणकर कशाला या असल्या चित्रपटात? म्हणजे उष्ट्या, चिवडलेल्या ताटात, कोंबडीच्या हाडकांत रसगुल्ला..कशाला

लालबाग-परळ...-१-

परवा घाईघाईत पोचलो, लालबाग-परळ बघण्यासाठी.. रविवार असल्याने भरपूर प्रेक्षक होते..मला काही मजा नाही आली सिनेमा बघून..खरे तर, आतापर्यंत वाचनात आलेले चाळीतले जीवन किती गोड रंगवले गेले आहे। पण पुलंच्या चाळीची संपन्नता इथे कुठेच नाही दिसली‌। सगळा नुसता गलिच्छपणा आणि गचाळपणाच दाखवलाय.. माझी लीलामावशी रहायची ती दादरची खांडके चाळ, कुणाल राहतो ती परळ मधली चाळ॥ किती छान होत्या त्या! मग सुरू झाले ते केवळ ओंगळवाणेपण...गरीबी वेगळी नि दारिद्र्य वेगळे ना! गरीबीतही स्वच्छ घरात, स्वच्छ चारित्र्याने राहता येतं की॥वस्तूंच्या असण्या-नसण्याशी आयुष्याच्या संपन्नतेचा काय संबंध? पण मला वाटतं, इथे या सिनेमात सौंदर्य, संपन्नता यांना कुठे जागाच नव्हती। सायकलवाला, मटनवाला यांच्याशी झालेली किरकोळ भांडणं थेट मारहाणीपर्यंतच पोचली। लगेच तोंडं, नाकाडं फोडणे, रक्तपात सुरू.. मग सरळ दादाकडेच धाव.. मग सोटे,बंदुका..ते हाताळणारे कोवळे हात.. दारुच्या बाटल्या रिचवणारी कोवळी पोरं.. शेजारची सावर्डेकर मामी नि मोहन यांच्यावर लक्ष ठेवणारी पोरं.. ती ही कोवळीच..दुकानात बसून धुरींच्या मुलीला गटवणारा नि फसवणारा मारवाड्याचा तरुण मुलगा.