सख्या ...

अंतर  तर  नाही  पडलंय आपल्यात ..
मग ते सारे  शब्द  कुठे गेले ?
गंध दरवळतोय इथे आसपास ,
मग बकुळफूल कुठे लपले ?

आत्ता आत्ताच  तर ,
तू  दिलेले रंग इथे  सांडले ..
ते  घेऊन  आलेले फुलपाखरू , 
कुठे  बरं  दडले ?

अजून  तुझ्या शब्दांचा भाव ,
लहरतोय माझ्या मनी ,
सांग , त्यांना खुलवणारे ,
चांदणे कसे  विरघळले ?

जा कुठेही , अस  कुठेही ,
मी काहीच  नाही  विसरले ..
तुझ्या  प्रीतीचे  मुग्ध गीत ,
अंतरात आहे जपलेले .....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २