Posts

Showing posts from August, 2007

कबीर...

आकाशात ढग येतात.ढगांमधून शुध्‍द पाणी बरसू लागतं.ते पाणी जमिनीवर येतं.पण जमिनीवर येता-येताच ते अशुध्‍द होऊ लागतं.हवेतील धुळीचे कण पाण्‍याच्‍या थेंबांना चिकटतात. मग जमिनीवर पडल्‍यानंतर सर्व प्रकारची घाण त्‍या थेंबांना लागते.आणि मग ते पाणी समुद्राच्‍या दिशेने वाहू लागतं.जसजसं ते पुढे वाहू लागतं तसतशी गावांमधील,नगरांमधील.शहरांमधील घाण त्‍याच्‍यात मिसळू लागते.मेघांमधून तर शुध्‍द जल निघालेलं होतं,परमात्‍म्‍याचं होतं... पण रस्‍त्‍यामध्‍ये जी सगळी घाण गोळा केली आहे,ती तुमची आहे.आणि जेव्‍हां नदी परत समुद्रामध्‍ये उतरेल,तेव्‍हां कोणत्‍या तोंडाने तुम्‍ही म्‍हणाल की मी समर्पण करतो आहे? तेव्‍हां तुम्‍ही हेच म्‍हणाल,जे कबीर म्‍हणत आहेत..... "मेरा मुझमें कुछ नहीं,जो कछु है सौ तोर,तेरा तुझको सौंपते क्‍या लागत है मोर." ही समर्पणाची स्‍थिती आहे.दुर्गुण माझे आहेत,सद्‌गुण तुझे आहेत. दोन्‍ही तुझ्‍याच पायांशी ठेवून देतो.तूच सांभाळ,जे तुला करायचं असेल ते कर. आणि ज्‍या दिवशी माणूस अशा प्रकारे परमात्‍म्‍याशी समर्पित होऊन जातो,त्‍या दिवशी सर्व दुर्गुण सद्‌गुणांच्‍या उपयोगी पडतात.अंधार प्रकाशाची पार्श...

कबीर...

"मन परतीत न प्रेमरस,ना कछु तनमे ढंग,ना जानौ उस पीवको,क्‍यों कर रहसी रंग.." मनामध्‍ये ना काही प्रतीति आहे,ना कोणता अनुभव आहे,ना कोणता प्रेमाचा रंग आहे." ना कछु तनमे ढंग" शरीरही काही सुंदर नाही. कोणत्‍या तोंडाने तुझ्‍यासमोर येऊ? तुझं दार ठोठावण्‍यासाठी धैर्य कोठून आणू? कोणत्‍या पात्रतेचा दावा करू? आणि, ना तुला कधी पाहिलं आहे,ना कधी जाणलं आहे.प्रियकराशी कधी ओळखच झाली नाही,त्‍या प्रियतमाशी मीलन कधी झालंच नाही,तर मला कसं समजणार की कोणता रंग,कोणतं रहस्‍य, कोणता आनंद प्राप्‍त होणार आहे तुझ्‍या द्‍वारावर? कशी तयारी करू? कोणत्‍या रंगाने स्‍वत:ला रंगवू? तुझ्‍या द्‍वाराशी कोणाचा स्‍वीकार होतो, हे मला कसं कळेल? भक्‍ताची हीच भावना असते की,माझ्‍यामध्‍ये माझं असं जर काही असेल तर ते माझे दुर्गुण आहेत..अंधार आहे.माझे सगळे रोग,सगळा त्रास आहे.माझ्‍यामध्‍ये चुकीच्‍या गोष्‍टीच खूप आहेत,आणि जे काही चांगलं आहे त्‍याच्‍याबद्‍दल मी काय सांगू? "मेरा मुझमे कुछ नहीं,जो कछु है सो तोर, तेरा तुझको सौंपते,क्‍या लागत है मोर..." जर काही चांगलं असेल तर तो तुझा सुगंध आहे, तुझं दान आ...

कबीर..

"अवगुन मेरे बापजी,बकस गरीब निवाज, जे मैं पूत कपूत हों, तउ पिताको लाज.." मला माहीत आहे,माझ्‍यात अवगुण तर आहेतच! तुलाही माहीत नसतील,असे दुर्गुण माझ्‍यात आहेत.तू मला मदत करावीस ती मी तिच्‍या योग्‍य आहे,म्‍हणून नव्‍हे.मी तेवढी पात्रता कमावली आहे,म्‍हणून तू हात पुढे कर असे मी म्‍हणतच नाही आहे.माझी कुठली एवढी पात्रता? पण तू गरीबांचा त्राता आहेस.ज्‍यांच्‍याजवळ काहीही नाही,त्‍यांच्‍यावर तू दया करतोस.तुझी करुणा अपार आहे.मी तुझ्‍या त्‍या करुणेला साद घालतो आहे.हे जे विनम्रतेचं बोलणं आहे, हा जो अहंकाराचा स्‍पष्‍ट स्‍वीकार आहे,हेच विनम्र भक्‍ताचं लक्षण आहे.अहंकाराला अगदी मुळापासून नष्‍ट करण्‍याचा हा प्रयत्‍न आहे.तपस्‍वी हिशोब ठेवतो किती तपश्‍चर्या केली त्‍याचा.साधक हिशोब ठेवत असतो,किती उपवास केले,किती पूजा केल्‍या,किती मंत्रजप केला,त्‍याचा.पण भक्‍ताची भावना वेगळीच असते.त्‍याला स्‍वत:च्‍या अवगुणांची जाणीव असते.आपण ते संपवू शकलो नाही,संपवता येणार नाहीत,हेही त्‍याला माहीत असते.मला ठाऊक आहे,सुपुत्र होण्‍याचा दावा मी करू शकत नाही.मी कुपुत्र असण्‍याचीच शक्‍यता जास्‍त आहे.पण ती माझीच चूक आहे, त्...

कबीर...

"सुरति करौ मेरे सांइया,हम हैं भवजल मांहि्..आपे ही बह जाएंगे,जे नहिं पकरौ बांहि...." कबीर सांगतात की तुम्‍ही सुरतीने भरून जा,परमात्‍म्‍याच्‍या स्‍मरणाने भरून जा.जसजशी त्‍याची आठवण दाट होत जाईल ,तसतसा तुमचा अहंकाराचा भाव कमी कमी होत जाईल."प्रेम गली अति सांकरी,तांमे दो न समाहि.."ही प्रेमाची वाट फार निरुंद आहे,फार बारीक आहे. एकतर परमात्‍म्‍याचे स्‍मण तरी शिल्‍लक राहील,किंवा अहंकार तरी! दोन्‍ही स्‍मरणं एकावेळी असूच शकत नाहीत.परमात्‍म्‍याची प्राप्‍ती हवी असेल तर स्‍वत:ला सोडावं लागतं.स्‍वत:ला पकडायचं असेल तर परमात्‍मा हातून सुटलाच,समजा!! पण ही सुरति साधावी कशी? कारण,अहंकार सारून सुरति साधली की.त्‍या सुरतीचाच एकनवीन अहंकार निर्माण होतो.कबीर पहिलं सूत्र सांगतात की,तुम्‍ही सुरतीने भरून जा.पण सुरतीला असं कवटाळू नका की,सुरतीमुळेच अहंकार निर्माण होईल.या अहंकाराची शकयताच सपून जावी,म्‍हणून कबीर दुसरं सूत्र सांगतात, " सुरति करौ मेरे सांइया" ते परमात्‍म्‍याला सांगतात की, मी तर तुझ्‍या स्‍मरणाने भरून जायचा प्रयत्‍न करतो आहे,पण तेवढं पुरेसं नाही.मी एकटा भवसागर पार करु शकणार...

सात शल्‍ये.....

चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, ये कामिनीला जरा, पद्‍मावीण तळे, निरक्षर मुखें जो साजिरा-गोजिरा, दात्‍याला धन नित्‍य, वसते दारिद्‌र्‌य विद्‍वज्‍जनीं, मूर्खांचा भरणा महीपतिघरी, ही सात शल्‍ये खरी.....

हे नववर्षा..

हे नववर्षा, माझं ओझं हलकं करुन तू माझं सांत्‍वन केलं नाहीस, तरी माझी तक्रार नाही; ते ओझं वाहण्‍याची शक्‍ती मात्र माझ्‍यात असावी, एवढीच माझी इच्‍छा..... ..........टागोर

चिटुकली?....

मावळतीला जाताना सूर्याने प्रश्‍न केला, "माझ्‍यानंतर या जगाला प्रकाश देण्‍याचे काम कोण करील?".. चंद्र आणि नक्षत्रे, सारे खाली माना घालून स्‍तब्‍ध उभे राहिले.. तेव्‍हां एक चिटुकली पणती चटकन्‌ पुढे होऊन म्‍हणाली, "प्रभो,माझ्‍याकडून जितके होईल, तितके मी करीन......." - रवींद्रनाथ टागोर

तेजातुनी..

तेजातुनी आम्‍ही झालो, तेजातच मिसळुनी जाऊ.. मातीमधुनी फिरून उठता, सूर्य नव्‍याने पाहू.....

जीवनदीप...

यौवन सरले सारे आता, मृगजळामागे धावता धावता.. आयुष्‍याच्‍या सायंकाळी, आम्‍हां आठवे तो वनमाळी.. संतभक्‍तीरस चाखता चाखता, जीवनदीप हलकेच विझावा......