लघुतम कथा...
शेजारच्या नानी सांगत होत्या, त्यांची आईबापावेगळी नात आज उदास आहे म्हणून; तिच्या परवाच येणार्या वाढदिवसासाठी घेतलेला फ्राक फारच साधा, प्लेन आहे, तिला छान दिसणार नाही,म्हणून; म्हंटलं, माझ्याकडे पाठवा तिला..
ती frock घेऊन आली. रंग छान गुलाबी होता. तिला म्हंटलं, माझ्याकडची सोनेरी लेस छान, नागमोडी लावून देते. तर, तिला ते फारच आवडले. पण लौकर देशील ना? आता मला frock छान दिसेल,म्हणाली.. तिला काही खरेदीसाठी गावात जायचेहोते. मी बरोबर येऊ का, विचारलं, तर ड्रायव्हर रामचाचांना घेऊन जाते, म्हणाली. मी तिला थोडेसं प्रेम आणि विश्वास दिला, तर छान खुलून आली होती......
काल म्हणे, बिग बझारमध्ये, तिला चिडवणार्या नि चोरी करणार्या नऊ जणांना तिने पकडून दिले होते..
आत्मविश्वास वाढताच, तिच्याजवळच्या आहे त्याच शक्तीने, केवढी मोठी कामगिरी बजावली होती....

Comments