असे आमचे लोकनेते...
Sunday, January 27, 2008
असे आमचे लोकनेते..
कालपासून डोके जरा भिरभिरलेलेच होते. शौरी आणि अमलचे बोरनहाण करायचे, तर तारखाच जमत नव्हत्या. त्यात दोन्ही मुलांच्या तब्येतींची कुरकुर.
ते तिळवण मुलांनी enjoy तर करायला हवे ना!
फोनाफोनी फार झाली, अन् तारीख निघाली नाहीच. निघताना पुन: ह्यांची-माझी कटकट झालीच!
ते घरी राहून आवराआवरीची बरीच कामे करणार होते. कधी नव्हे तो मी free hand दिल्यावर,
त्यांना अगदी घाई झाली होती. कधी एकदा ही जात्ये, असे झाले होते. पण मला तसे दिसू तरी द्यायचे नव्हते ना! मला परत nobody loves me चे feeling आले..
झाले..लागले डोळे वाहायला! मग धडाधडा तयारी केली, नि निघाले एकदाची! भरीला बेगम अख्तरची गझल लावली नि शांतपणे रडत राहिले..
काल दोघांनी बेलापूरला जायचे ठरवले होते,पण मला एकटीलाच निघावे लागले.शनिवारी मोहरमची सुटी
आल्याने बँकेची कामे रखडली, सोमवारवर गेली.ती करण्यासाठी ह्यांना घरी राहणे भाग होते.
सगळं आवरताना निघायला बारा वाजले.तशी घाईही नव्हती, कारण मिनू चार वाजताच घरी येणार होती.
आता रस्ता जरा बरा झालाय नि वाहनांची गर्दीही आज कमी वाटली. जरा वेळाने लक्षात आले की, S.T.च्या बसेस जरा जास्तच जातायत, मुंबईच्या दिशेने.. मी काही फार वेगात नव्हते,
त्यामुळे बर्याच बसेस रोरावत मला overtake करत होत्या.
तासाभरात डोळेही कोरडे झाले,नि डोकेही जागेवर आले...तर, त्या सगळ्या बसेस भारतीय जनता पार्टीने hire केल्या होत्या.साठ तरी असतील. शिवाजी पार्कवर नरेन्द्र मोदींची जाहीत सभा होती,त्यासाठी मंडळी
निघाली होती. बसेस,खाजगी jeeps , cars चा ताफा निघाला होता, कुणाच्या खर्चाने,कोण जाणे!
एव्हांना दीड वाजत आला होता.हळूहळू रस्त्यात काही ठिकाणी थर्माकोलचे पेले, अर्धवट खाल्लेले lunch-packs यांचा सडा दिसू लागला. थांबलेल्या बसेस, भोवतीने त्या राजकारणी लोकांचा गराडा,
अन्नाची नासाडी.... सगळेच मन विषण्ण करणारे होते..
आता रागही यायला लागला. हा रस्ता आता four-lane होऊ घातलाय, तो असाच घाण ठेवणार आहोत का आपण?या नेत्यांची आणि पक्ष-कार्यकर्त्यांची हीच का जबाबदारीची जाणीव? ह्या लोकांना आपण निवडून देतो, ते समाजाची सेवा करायसाठी, की माज करण्यासाठी?
अन्न पिकवणारा शेतकरी आज आत्महत्यांच्या भोवर्यात सापडलाय, उध्वस्त होतोय,
आणि आपण अन्नाची अशी नासाडी करतोय? मग, एकेक आठवत राहिले...
श्रावण महिन्यात, ब्रह्मगिरीच्या फेरीनंतर मार्गभर पसरलेले चहादुधाचे पेले,खिचडीचा सडा.....
नवरात्रात, कालिकेच्या जत्रेनंतर सगळीकडे पसरलेला कचरा....
अनंतचतुर्दशी नंतर गणेशमूर्तींच्या अवशेषांनी विद्रूप बनलेले किनारे....
६डिसेंबरच्या मेळाव्यानंतर घाणेघाण झालेले शिवाजी पार्क....
कुंभमेळ्यानंतरचा गोदाघाट....
किती नि काय काय म्हणूनआठवायचे? नि येऊन-जाऊन घाणच आठवायची ना?
या ताफ्यातली ४० नंबरची बस बराच वेळ माझ्या पुढेच होती.मला अंतर राखावे लागत होते, नाही तर पिचकार्या screen वर आल्या असत्या ना!!
एका बसवर विजय सानेंच्या नावाचा फलक होता. हे आमचे इंदिरानगरवासी..पण ती बसही कचर्याने वेढलेलीच!मनाशी ठरवलं की यावर लिहायचेच.....photo ही घ्यायचे होते, पण एकटी होते, म्हणून गाडीतून नाही उतरले..
परवा, द्वारका सर्कलला सहा press-reporters ना, त्यांच्या तवेरा गाडीसकट kidnap करुन झोडले ना.......

Comments
निसर्गप्रेम तेहि आपलंच ऊतू जातं...
माणूसकी, तोही आपलाच ठेका...
तर त्यामुळे ह्या मंडळींना काही कामंच उरत नाही बहुतेक...
शेवटी its our inner sense dat controls us...!!! त्याच्याशी राजकारणी लोकांचा काय संबंध नाही का...!!!
frustration is for ppl like us to emjoy...