प्रकाश आणि काळोख

एकदा प्रकाशाचे आणि काळोखाचे श्रेष्‍ठत्वावरून भांडण झाले.प्रकाशाने काळोखाला म्‍हंटले,
"काय रे,सगळे काही 'गुडुप' करणारा स्‍वभाव तुझा! मी बघ कसा,
सर्व काही 'उजळ' करणारा..सर्वांना दृष्‍टी देणारा"..
काळोख शांतपणे म्‍हणाला,
"कशाला हवास रे तू? फक्‍त काळे-गोरे बघायला? दृष्‍टी देऊन दृष्‍टिकोण वजा करणारा?
मी बघ कसा,माझ्‍या मिठीत सामावून घेतो सर्वांना..माझ्‍या उपस्‍थितीत सांगू शकणार का,
कोण काळा आणि कोण गोरा ते? ..."
प्रकाश निरुत्तर झाला, आणि काळोखात सामावून गेला....

Comments

Popular posts from this blog

उपनिषद चिंतन : - ८

प्राण्‍यांवरचे प्रेम...?

उपनिषद चिंतन : - २