किती पुढे निघून आले, नाती निभावता निभावता.. स्वतःलाच हरवून बसले, नाती घडवता घडवता.. लोक मला म्हणतात, तू हसतेसच फार, अन् मी थकून गेले, दुःखे लपवता लपवता.. सुखी,सुखी होते मी, दुसऱ्यांना आनंद देता देता, माझी काळजी नाही करत, दुसऱ्यांची पर्वा करता करता. रंगून जाते मी, सुखाची फुलं वेचता वेचता, माझं काही मोल नाही, अनमोल नात्यांना निभावता, निभावता....