असे आमचे लोकनेते...
Sunday, January 27, 2008 असे आमचे लोकनेते.. कालपासून डोके जरा भिरभिरलेलेच होते. शौरी आणि अमलचे बोरनहाण करायचे, तर तारखाच जमत नव्हत्या. त्यात दोन्ही मुलांच्या तब्येतींची कुरकुर. ते तिळवण मुलांनी enjoy तर करायला हवे ना! फोनाफोनी फार झाली, अन् तारीख निघाली नाहीच. निघताना पुन: ह्यांची-माझी कटकट झालीच! ते घरी राहून आवराआवरीची बरीच कामे करणार होते. कधी नव्हे तो मी free hand दिल्यावर, त्यांना अगदी घाई झाली होती. कधी एकदा ही जात्ये, असे झाले होते. पण मला तसे दिसू तरी द्यायचे नव्हते ना! मला परत nobody loves me चे feeling आले.. झाले..लागले डोळे वाहायला! मग धडाधडा तयारी केली, नि निघाले एकदाची! भरीला बेगम अख्तरची गझल लावली नि शांतपणे रडत राहिले.. काल दोघांनी बेलापूरला जायचे ठरवले होते,पण मला एकटीलाच निघावे लागले.शनिवारी मोहरमची सुटी आल्याने बँकेची कामे रखडली, सोमवारवर गेली.ती करण्यासाठी ह्यांना घरी राहणे भाग होते. सगळं आवरताना निघायला बारा वाजले.तशी घाईही नव्हती, कारण मिनू चार वाजताच घरी येणार होती. आता रस्ता जरा बरा झालाय नि वाहनांची गर्दीही आज कमी वाटली. जरा वेळाने लक्षात आल...